सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

आष्टा : आष्टा नगर पालिकेचे पालक नेते, सांगली जिल्हा राष्र्टवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, विलासराव भाऊसो शिंदे (वय 85) यांचे आज पहाटे निधन झाले.

आष्टा : आष्टा नगर पालिकेचे पालक नेते, सांगली जिल्हा राष्र्टवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, विलासराव भाऊसो शिंदे (वय 85) यांचे आज पहाटे निधन झाले.

विद्यार्थीदशेत असताना 1945 पासून राजकारणात होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या यांच्या सोबत काम कले 1962 ला जि प सदस्यपदी निवडून आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा वारसदार म्हणून जिल्ल्हा त्यांच्याकडे पाहात होता. वसंतदादा निवृत्तीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष होते. सांगली जिल्ल्हा मध्यवर्ती  बँकेचे अध्यक्ष होते, 25 वर्षे संचालक आहेत. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत त्यानी. राजाराम बापू पाटील, व एन डी  पाटील पाटील या दोन दिग्गजांचा पराभव करुन राज्याचे लक्ष वेधले होते. काही काळ  ते राजकिय विजनवासात होते,1990 नंतर त्यानी राजाराम बापू यांचे चिरंजीव माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी समेट करत, राजकीय संघर्ष थांबवला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासुन ते सांगलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. 2005-06 ला सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाली होती. अाष्टा शहरावर  त्यांची एकहाती सत्ता असुन पालिकेत 20 वर्षे सत्ता आहे.

चार महिन्यांपासून ते श्वसनाच्या अाजाराने त्रस्त होते. अाष्टा कोल्हापुर येथील दवाखान्यात उपचार सुरु होते. घरी असताना सोमवारी पहाटे त्याना त्रास होऊ लागला. उपचारासाठी दवाखान्यात  नेत  असताना त्यांचे निधन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Sangali District president Vilasrao Shinde passed away