सेना राष्ट्रवादी युतीला महाआघाडीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी विरोधात भाजप-जनसुराज्य व मित्रपक्षांची महाआघाडी अशी एकास एक लढत होणार आहे.

मलकापूर - मलकापूर पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांनी ताकद एकवटली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री विनय कोरे, आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर व प्रवीण प्रभावळकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी विरोधात भाजप-जनसुराज्य व मित्रपक्षांची महाआघाडी अशी एकास एक लढत होणार आहे.

शिवसेनेला नगराध्यक्षांसह 12 व राष्ट्रवादीला 5 जागा देण्याचे ठरले आहे. भाजप-जनसुराज्य महाआघाडीतून नगराध्यक्षांसह 9 जागा भाजपला व इतर 8 जागा जनसुराज्यला देण्याचे ठरले आहे. राष्ट्रवादी चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण, भाजपचे कमळ, जनसुराज्याचा नारळ असेल. पक्षापेक्षा गटातटांच्या राजकारणाला येथे महत्त्व आहे. आघाड्यांची जुळवाजुळव व जागा वाटप यामध्ये नाराज झालेले माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे, माजी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांचीही वेट अँड वॉचची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP-Sena challenged by alliance