‘एसी’त बसून सरकारकडून दुष्काळाचा आढावा - जयंत पाटील

‘एसी’त बसून सरकारकडून दुष्काळाचा आढावा - जयंत पाटील

बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील  यांनी बागणी येथे उपस्थित केला. विरोधकांनी कितीही चंग बांधला, तरी माझा मतदारसंघातील जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार पाटील यांनी बागणी गावात सुतारवाडा, मोमीनवाडा, आंबेडकरनगर, चांदोली वसाहत, नेमिष्टे गल्ली, पांढर मळा, पाटील वाडा आदी ८ ठिकाणी बैठका घेऊन सामान्य माणसांशी थेट संपर्क केला.

जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब  पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील, एल. बी. माळी, विलासराव माळी, उपसरपंच विष्णू किरतसिंग, भगवान पाटील, राजेंद्र पवार, सुभाष  हवलदार, सतीश काईत प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले,‘‘देशातील जनतेने २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींना मतदान केले होते. मात्र गेल्या ५ वर्षांत त्यांनी विकास कामे करण्यापेक्षा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत राज्य घटनेची प्रत जाळली, मात्र मोदींनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. कोणी काय खावे? यावरही बंधने लावली. तुमचे एक  मत या सामान्य माणूस व शेतकरी विरोधी सरकारला बदलू शकते. बागणी गावाच्या विकासात आपण  सातत्याने भर घातली असून आपले ३०-३५ वर्षांचे ऋणानुबंध आहेत.’’

संभाजी कचरे म्हणाले, ‘‘आता विधानसभेच्या तोंडावर अनेकजण येतील, आश्वासने देतील. मात्र आपण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आमदार जयंत पाटील हे राज्यातील यशस्वी, अभ्यासू व कर्तबगार नेतृत्व आहे. भविष्यात त्यांना राज्यात मोठी संधी मिळणार असून त्याचा लाभ आपले गाव अधिक  पुढे नेण्यास होणार आहे. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा रहा.’’

डॉ. डी. बी. पाटील, डी. के. पाटील, अल्लाउद्दीन चौगुले, बाजीराव माने, डॉ. राजन अडसरे, दत्ता पाटील, नामदेव पाटील, यशवंत पाटील, किसन मलप, सतीश शेटे, पप्पू शेळके, विनायक दाभोळे, विजयकुमार भाले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com