'भाजपला राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नगर : नगर महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगपात यांनी राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.

नगर : नगर महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगपात यांनी राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.

अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांना बगल देत अभद्र युतीच्या सत्तेचे शिखर गाठले. चौथ्या क्रमांकाचे नगरसेवक असतानाही भाजपने राष्ट्रवादी व बसपच्या सोबतीने महापौरपद मिळविले. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना या बेरजेच्या राजकारणाने हवालदिल केले असून, आघाडीतल्या कुरघोडीला पुन्हा बळ मिळण्याचे सूतोवाच आहे. यामुळे संग्राम जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संग्राम जगताप म्हणाले, की राष्ट्रवादी 
सत्तेत सहभागी होणार नाही. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यात येईल. शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपा पाठिंबा देत आहोत. सत्तेत कोणतेही पद घेणार नाही. आमची याठिकाणी पाठिंबा दिल्याची भूमिका पक्षाला भूमिका समजून सांगू.

भाजपला महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना 24, तर राष्ट्रवादी 19 जागा मिळवून अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होते, तरीही भाजपने महापौरपद पटकावले. "सत्तेसाठी काहीही'चा हा खासा "नगरी' पॅटर्न म्हणून उदयास येणार आहे. काँग्रेसने मतदानावर बहिष्कार घातला. या निवडणूक प्रक्रियेत वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केले म्हणून सभागृहातच त्याला शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मारहाण केली.

Web Title: Ncp supports BJP externally says Sangram Jgtap