शिवेंद्रराजेंच्या  विरोधात राष्ट्रवादी करतेय 'या' तीन पर्यायांचा विचार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते.

सातारा : शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये जाताच शरद पवारांनी तिथलं डँमेज कंट्रोल हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मीच विजयी होणार, असा निश्चय शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या विरोधात शरद पवार नेमकं कोणाला उभं करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच शरद पवारांनी माझ्याकडे तीन अर्ज पडून असल्याचे सांगितले.

शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते. पहिल्या पर्यायाला उदयनराजेंकडून नकार आल्यास उदयनराजेंचे समर्थक अमित कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शेवटचा आणि तिसरा पर्याय म्हणजे शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्विण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP think about this three option satara assambly seat