राष्ट्रवादी महिला आघाडी निवडणुका ताकदीने लढणार - चित्रा वाघ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी राज्यभर ताकदीने लढेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी 
व्यक्त केला. 

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी राज्यभर ताकदीने लढेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी 
व्यक्त केला. 

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षा वाघ बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगली विधानसभा क्षेत्र महिला शहर कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदी छाया जाधव यांची निवड करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वसुधा कुंभार, लीलाताई जाधव आदी उपस्थित होते. 
वाघ म्हणाल्या, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतर खुल्यासह आरक्षित जागांवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एका जागेसाठी चार ते पाच महिलांनी उमेदवारी मागतली आहे. झेडपी, पंचायत समित्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांशी आघाडीची राज्यपातळीवरून बोलणी सुरू आहेत.’’

सांगली विधानसभा क्षेत्राची महिला कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष- डॉ. जाधव, कार्याध्यक्ष- ॲड. शोभा पवार, उपाध्यक्ष मीनल कुडाळकर, उषा पाटील, अनुजा पाटील, अरुणा खेमलापुरे. सचिव- संगीता जाधव, सहसचिव- नसीमा चाऊस, सरचिटणीस- नम्रता पाटणकर, प्ररवीण बागवान, मंगल पांचाळ, संयोगिता हेरकर, गुलशन बाणदार, कोषाध्यक्ष निकिता माळवदे, नलिनी सपाटे, कार्यकारिणी सदस्य- मंगल पाटील, अनिता शिंदे, पद्ममा कोळी, लक्ष्मी गडकरी, वंदना सूर्यवंशी, उज्ज्वला सूर्यवंशी, शारदा माने, ज्योती चव्हाण, शकुंतला वाघमारे, जयश्री केसरे. 

Web Title: ncp women aghadi election power