राष्ट्रवादीचे उमेदवार जनसामान्यांशी नाळ असणारे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कोनवडे - विकासाचा चेहरा असणाऱ्या जीवन पाटील, एस. के. पाटील, एन. डी. कुंभार यांना निवडून आकुर्डे जिल्हा परिषद व पंचायत समितीचा विकास साधा. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार हे जनसामान्यांशी नाळ असणारे आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे प्रतिपादन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. ते दारवाड (ता. भुदरगड) येथे आकुर्डे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार प्रारंभ व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे अध्यक्षस्थानी होते. 

रणजितसिंह पाटील, निवासराव देसाई, पी. डी. पाटील, अशोकराव भांदिगरे प्रमुख उपस्थित होते. मतदारसंघात हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढून मेळाव्यास सुरवात झाली. 

अशोकराव चौगले यांनी स्वागत केले. या वेळी दत्तात्रय पाटील, आर. व्ही. देसाई, शिवाजी देसाई, संभाजीराव पाटील, अण्णासाहेब पाटील, आनंदा कडव, उदय पाटील, आर. एस. कांबळे, डॉ. मधुकर नलवडे, आबासाहेब भोसले, रावसिंग पाटील, रामभाऊ चौगले, विठ्ठल कांबळे, वसंत चोडणकर, अनिल कोरे, धनाजी देसाई, संजय मालंडकर, भीमराव पोवार, अनिल हळदकर, संदीप हळदकर, सुरेश डांगे, विठ्ठल पाटील, सुरेश पाटील, भीमराव पाटील, एस. आय. पाटील, वाय. बी. पाटील, मुरलीधर पाटील, राजेंद्र पाटील, धोंडिबा खोत, के. आय. चौगले, नामदेव कुपटे, जयसिंग साळवी, भिकाजी मोरे, संजय ढेरे, ज्ञानदेव देसाई, अमोल गोजारे, धोंडिराम गुरव, बाबूराव गुरव, अशोक बंगार्डे, बाळासाहेब बेलेकर, भगवान देसाई, यशवंत देसाई, विष्णू गुळंबे, तुकाराम वैद्य आदींसह मतदारसंघातील कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजीराव राजिगरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पाटील यांनी आभार मानले.

Web Title: ncp zp konwade