मोहोळच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना संतोष सुरवसे 

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मोहोळ - नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता उर्फ वंदना संतोष सुरवसे यांनी शिवसेनेच्या सिमाताई पाटील यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केला. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचेच उमेदवार विद्यमान उपनगराध्यक्ष शौकत तलफदार यांनी भाजपाचे सुशील क्षिरसागर यांचीही दहा विरूद्ध सात मतानी पराभव करीत नगरपरिषदेत  माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचीच सत्ता कायम ठेवली. 

यावेळी विजयी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची शहरातुन  पंचरंगाची मुक्त उधळण करीत भव्य मिरवणुक काढण्यात आली. नगराध्यक्ष हे खुल्या महिला वर्गासाठी आरक्षित होते. त्यामुळे शहराचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असलेल्या पाच महिला नगरसेविका, व सेनेकडे असलेल्या चार महिला नगरसेविका यापैकी कोण भुषविणार यांची उत्सुकता व चर्चा  अनेक दिवसापासुन शिगेला पोहचली होती. 

राष्ट्रवादीचे विद्यमान नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह, सरिता उर्फ वंदना सुरवसे, शौकत तलफदार, शाहीन शेख ,संतोष खंदारे, प्रमोद डोके व दत्तात्रय खवळे, अर्चना वायचळ, मनिषा  फडतरे, सुवर्णा गाढवे, यांनी प्रत्यक्ष मतदानात हातावर करीत सहभाग घेतला. शहराचे किंगमेकर तथा माजी जि.प.सदस्य  शहाजहान शेख यांच्या धुर्त मागदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या इच्छुक नगरसेवकांनी अखेर वैयक्तीक महत्वकांक्षेला लगाम घालीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचीच सत्ता कशी अबाधित ठेवायची यांची रणनिती निश्चीत केली होती. तर शिवसेनेचे जि.प.चे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड यांनी सेनेच्या  जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातुन  तालुकाप्रमुख काका देशमुख यांच्या सहकार्याने, सिमाताई पाटील, सुशिल क्षिरसागर, महादेव गोडसे, अतुल गावडे, नसीमा बोंगे, अनिता सोनटक्के, राणी गोडसे, आदी शिलेदारांना सोबत घेत सत्ता परिवर्तनाचा अखेर प्रयत्न सुरूच ठेवला होता. अखेर सत्तेच्या संगीत खुर्चीच्या मुत्सद्दी रणनितीमध्ये राष्ट्रवादीने सेनेला सफशेल पराभुत केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's Vandana Santosh Surawese will be the president of Mohall city