karhad rains.jpg
karhad rains.jpg

एनडीआरएफने पुसले पुरग्रस्तांचे अश्रु

कऱ्हाड : पुरग्रस्त तांबवे गावाला चारी बाजुने पाण्याने वेढले आहे. त्यामुळे गावाची बेटासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या बचाव कार्यासाठी आज सकाळी एनडीआऱएफचे जवान दाखल झाले आहेत. त्यांनी सकाळपासुन न थकता पुरग्रस्तांना महापुरातुन बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली आहे. भेदरलेल्या पुरग्रस्तांना आधार देत त्यांनी पावसाच्या उभ्या धारेतही बचाव कार्य थांबवले नाही. शेकडो पुरग्रस्तांना बाहेर काढुन त्यांचे अश्रु पुसण्याचे काम एनडीआऱएफचे जवानांनी  केले. त्यांच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. 

कऱ्हाड तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नदीकाठच्या तालुक्यातील तांबवे, दुशेरे, आटके गावे पुरग्रस्त झाली आहे. त्यामुळे पुरग्रस्त गावातील लोकांना बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र संबंधित गावात पहिल्या दिवशी लवकर बोटच उपलब्ध न झाल्याने पुरग्रस्तांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे गरोदर महिला, वयोवृध्द, काही रुग्ण, लहान बाळ यांची मोठी गैरसोय झाली होती.

मात्र आज सकाळीच गावात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी एनडीआऱएफची टीम रवाना केली. त्यांनी गावात पोहचल्यापासुन मदत कार्य सुरु केले आहे. त्यामुळे गावातील लोकांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी शेकडो पुरग्रस्तांना बाहेर काढुन त्यांचे अश्रु पुसण्याचे काम केले. तांबवे गावात आज पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार यांनी तांबवे गावास भेट देवुन ज्यांची घरे जीर्ण झाली आहेत, ज्यांची घरे पाण्यात गेली आहेत त्या घरातील लोकांना बाहेर पडण्याचे आवाहन केले.

मात्र बाहेर आल्यानंतर अगोदर बोटीसाठी झुंबड उडत असल्याने बाहेर पडणाऱ्यांची संख्या शेकड्यात आणि बोट मात्र एकच अशीच स्थिती झाली. त्याच माहिती प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिल्यावर तहसीलदार यांनी गावात भेट दिली. त्यांनी तातडीने उद्या आणखी एक बोट देण्याची कार्यवाही केली आहे. त्यामुळे दोन बोटीतुन पुरग्रस्तांना बाहेर काढण्यात येईल. 

ग्रामस्थ जागवताहेत रात्र

तांबवे गावामध्ये बुधवारी सायंकाळनंतर पुन्हा पाणी पातळी वाढु लागली आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण आहे. जीर्ण झालेली घरे पडुन लागली आहेत. त्याचबरोबर गावात पाणी वाढु लागल्याने गावातील लोक चिंतेत आहेत. त्यातच गावात लाईट नाही. त्यामुळे मोबाईल टाॅवरही बंद झाल्याने तेथे संपर्कही होणे कठीण बनल्याने ग्रामस्थ भयभीत असुन ते रात्र जागवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com