समान विचाराच्या कार्यकर्त्यांचे संघटन करण्याची गरज : हजारे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

राळेगणसिद्धी : भ्रष्टाचार मुक्त भारताची निर्मिती करावयाची असेल तर चांगल्या कार्यकर्त्यांनी समर्पीत भावनेने देशासाठी व समाजासाठी काम करणे गरजेचे आहे. त्या साठी त्यांना आपल्या जिवनात थोडासा त्याग करावा लागेल.अशा समान विचाराच्या कार्यकर्त्यांचे राजकारणविरहीत संघटन या पुढील काळात करावे लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनांच्या कार्यकत्यांचे दोन दिवशीय शिबीर आज (ता.28) येथे सुरू झाले. त्या वेळी हजारे बोलत होते. 

या वेळी हजारे म्हणाले, की आता नव्याने राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास च्या राजकारणविरहीत समित्या स्थापन करावयाच्या आहेत. त्या साठी या समितीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कामाविषयी ज्ञान व्हावे या साठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळात देशात कोणाचेही सरकार असो या सरकारवर कार्यकर्त्यांचा असा दबावगट तयार झाला पाहीजे की, सरकारला चुकीची कामे करता येता कामा नये तसेच सरकारमधील अधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांवर अंकुश निर्माण व्हावा यासाठी या समित्या गठीत करण्यात येणार आहेत. 

या समितीत सहभागी होणाऱ्या या सदस्यांना आपल्या तालुक्‍यात किंवा जिल्हा स्तरावर काम कसे करावे या साठी या शिबिरात प्रशिक्षण देण्यात येत आहे. या समितीत ज्या सदस्यांनी या पुढील काळात राजकारणात प्रवेश करणार नाही व निस्वार्थी वृत्तीने देशासाठी व समाजासाठी विना मोबदला योगदान देण्याचे प्रतिज्ञापत्र भरून दिले आहे त्यांनाच या प्रशिक्षणासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. तसेच अशाच कार्यकर्त्यांना समितीत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. 

Web Title: Need to bring like-minded people together, says Anna Hazare