
- त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र
- सरदेशमुखांच्या कादंबऱ्यांवर परिसंवाद
- संस्मरणातून जागवल्या सरदेशमुखांच्या आठवणी
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्याचा धांडोळा घेताना त्यांच्यातील शिवतत्वाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. अभ्यासकांनी त्यांच्या शैलीचाही अभ्यास करावा. साहित्यकृतींना लाभलेल्या वैशिष्ट्यांमध्ये समकालीन आणि तत्कालिक या पलीकडचे विचार त्यांनी मांडल्याने वाचकांवर त्यांच्या साहित्याचे गारुड होते असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. निशिकांत ठकार यांनी केले.
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळा
ज्येष्ठ साहित्यिक सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्य अकादमी, संगमेश्वर महाविद्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूरची शाखा यांच्यावतीने आज संगमेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य, डॉ. महादेव देशमुख, संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी, अकादमीचे समन्वयक रत्नाकर पाटील, मसापच्या सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष ऍड. जे. जे. कुलकर्णी, सरदेशमुख यांच्या कन्या अनुराधा कशेळीकर, वसुमती भंडारे, आकाशवाणीचे सुनील शिनखेडे, डॉ. राजशेखर शिंदे, दत्ताअण्णा सुरवसे, मनोज कुलकर्णी, नितीन वैद्य, हेमकिरण पत्की, प्रिया निघोजकर, डॉ. दत्ता घोलप, डॉ. रमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंचित आघाडीला मोठा धक्का; आंबेडकर बाहेर
उद्घाटनानंतर दुपारच्या पहिल्या सत्रात परिसंवाद झाला. त्र्यं. वि. सरदेशमुख संस्मरण विषयावर सकाळचे मुख्य उपसंपादक रजनीश जोशी, सरदेशमुख यांच्या कादंबऱ्या विषयावर नितीन वैद्य, सरदेशमुख यांच्या कादंबऱ्यांची भाषाशैली विषयावर सुनील शिनखेडे, सरदेशमुख यांच्या कादंबऱ्यांतील व्यक्तिचित्रण विषयावर मेधा सिधये यांनी परिसंवादात सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी विजय पाडळकर होते. तिसऱ्या सत्रात सरदेशमुख यांची समीक्षा या विषयावरील परिसंवादात राजा होळकुंदे व मनोज कुलकर्णी यांनी तर सरदेशमुख यांच्या कवितेतील संवेदनविश्व विषयावर हेमकिरण पत्की यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. राजशेखर शिंदे होते.
महाराष्ट्र