उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत : डॉ. निलम गोऱ्हे

तात्या लांडगे
शुक्रवार, 12 जुलै 2019

- आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे.

- त्यानुसार शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

- शिवसेनेने मला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची संधी दिली असून तब्बल पंचावन्न वर्षांनंतर त्या ठिकाणी महिलेला संधी मिळाली आहे.

सोलापूर : शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांचे प्रश्‍न सोडविण्यात शिवसेना आग्रही राहीली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळावा ही सर्वांचीच इच्छा असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात यावे, जेणेकरुन त्याचा अन्य आमदारांना निश्‍चितपणे फायदा मिळेल, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. त्यानुसार शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.  दरम्यान, शिवसेनेने मला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची संधी दिली असून तब्बल पंचावन्न वर्षांनंतर त्या ठिकाणी महिलेला संधी मिळाली आहे.

त्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या कुटुंबातील विधवा महिला, ऊसतोड कामगार, पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neelam Gorhe comments about Uddhav Thackeray at Solapur