नेवाशात प्राध्यापकांच्या संपाला वाढता पाठींबा; विद्यार्थीही होणार सहभागी

newase.
newase.

नेवासे : राज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, यापूर्वीच्या ७२ दिवसांच्या आंदोलनाचे वेतन मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी पुकारलेला संप शुक्रवार (ता. २८) रोजी चौथ्या दिवशीही चालूच होता. मात्र मतभेदातून नेवाशात 'एम.पुक्टो' संघटनेचेच्या पदाधिकार्यासह काही प्राध्यापकांनी संपाकडे पाठ फिरवल्याने महाविद्यालयाच्या तासिका वेळेवर होत आहे. मात्र या संपात आता शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थी संघटना सहभागी होणार असल्याने हे आंदोलन चिघळण्याचे चिन्ह आहेत. 

 नेवासे महाविद्यालयात संघटनेचे सचिव डॉ. नूरमहंमद शेख, प्रा. डॉ. भिमराज सोनवणे, प्रा. डॉ. शशिकांत तपासे, प्रा. प्रकाश वाळूंज यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक संपात सहभागी झाले आहे. दरम्यान या संपाकडे खुद्द महाविद्यालयातील 'एम.पुक्टो' संघटनेचे अध्यक्षासह काही प्राध्यापकांनी या संपाकडे पाठ फिरवली आहे. मात्र येत्या एक-दोन दिवसात हे आंदोलन तीव्र होण्याचे चिन्हे आहेत. 

दरम्यान आज नेवासे येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयात झालेल्या सभेत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा. अरुण घनवट, प्रा. चांगदेव कदम, प्रा. अशोक तुवर, प्रा. राजेंद्र दारकुंडे, प्रा. नवनाथ आगळे, प्रा. अजय पाटील, प्रा. रंगनाथ रौंदळ, डॉ. ज्ञानदेव झिने, प्रा. विठ्ठल दरंदले, डॉ. बाळासाहेब जगताप, डॉ. सुरेश काळे, प्रा. आविनाश साळवे, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. दिनकर आवारे,  प्रा. दत्ता वाकचौरे, प्रा. योगेश साळवे, प्रा. बाळासाहेब खेडकर, प्रा, पुष्पलता घोरपडे, प्रा. भोगे, प्रा. सुभाष आगळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थींनींनी संपास पाठिबा दिला.   नेवाशात संपाला विद्यार्थ्यांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने हा संप चिघळण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी संघटना संपात सहभागी होऊन आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान विद्यापीठाने महाविद्यालयाकडून संपात सहभागी प्राध्यापकांची व झालेल्या तासिकांची माहिती दररोज मागवत आहे.  

प्राध्यापकांत नाराजी
दरम्यान एम.पुक्टो संघटनेच्या वरिष्ठ  नेते व पदाधिकारी यांनी या संपात सहभागी न होणार्या प्राध्यपकांना यापुढे कोणतीही मदत करायची नाही. त्यांचे कोणतेही काम करायचे नाही. असा निर्णय जाहिर केल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक अध्यक्षांना किंवा पदाधिकार्यांना विश्वासात न घेताच निर्णय लादत असल्याने अनेक प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

... तो पर्यंत संप चालुच :  प्रा. डॉ. नूरमहमंद शेख 
"संपात सर्व प्राध्यापक सहभागी आहे. आमच्या मागण्या रास्त असून शासन जो पर्येंत आमच्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन देत नाही तो पर्येत संप चालूच राहणार असल्याचा इशारा एम. पुक्टोचे महाविद्यालय शाखेचे सचिव  प्रा. डॉ. नूरमहंमद शेख यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com