मंगळवेढा किल्ल्याकडे पर्यटन खात्याचे दुर्लक्ष

Mangalwedha fort
Mangalwedha fort


मंगळवेढा : स्व. प्रल्हाद शिंदे यांनी गौरवशाली महाराष्ट्रात “मंगळवेढा भुमी संतांची अशी ओळख लोकगीतामधून करून दिली. याच नगरीतील ऐतिहासीक व प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटन विकास खात्याच्या दुर्लक्षामुळे याचे जतन होताना दिसत नाही. या महत्वपूर्ण बाबींकडे वेळीच लक्ष दिल्यास नवीन पिढीला ऐतिहासिक स्थळांचा ठेवा पाहता येणार आहे.


मंगळवेढयात चालुक्य, कलचुरी घराण्याची काही काळ राजधानी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण त्याकाळात महत्वाचे होते.  1665 साली शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. हा किल्ला विजापूरच्या जवळ होता. तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. 1685 मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला. सध्या किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले आहेत. अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत.
 आज या किल्ल्याचे महत्व कमी झाले आहे. आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे. त्याला चारसुस्थितील मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. 

किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात. किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात 1572 साली मंदिराचा जीर्णोद्धारकेल्याचा उल्लेख आढळतो. प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्या मुलाचा याठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. असे जाणकाराचे मत असून आठव्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रम्हाचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ नष्ट झाले असले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. ब्रम्हदेवा बाबतीत वैशिट्याच्यी बाब म्हणजे जगातील हे ब्रम्हदेवाचे मंदिर असणारे दुसरे ठिकाण आहे असे मानले जाते. राजस्थानातील पुष्कर नंतर या ठिकाणी एकमेव असे ब्रम्हदेवाचे मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या ब्रम्हदेवाच्या मूर्तीस विशेष महत्व असताना संबंधित विभागाचे लक्ष असणे गरजेचे आहे. संत चोखामेळा, संत दामाजी, कान्होपात्रा, संत टिकाचार्य, मोहीनीबुवा, गोफनबाई, या संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शहरातील शहरात आलेल्या भविकांना विविध संताच्या समाधीची ठिकाणेही लवकर सापडत नाहीत शिवाय कृष्ण तलावातही गाळ काढताना जुन्या काळातील सापडलेल्या मुर्तीही नगरपलिकेच्या व्हरांड्यात ठेवल्या असून या सर्व ऐताहासीक मुर्तीचे जतन करणे आवश्यक आहे. अन्यथा मंगळवेढ्याचा ऐताहासीक वारसा पुसला जाईल. 

मंगळवेढ्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मुख्यमंत्री देवें द्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करणार 
प्रशांत परिचारक, आमदार 

 

सिक वारसा  जतन करून संतनगरीचा नावलौकिक वाढविण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने प्रस्ताव शासनाने दरबारी देणार आहे. 

अरूणा माळी नगराध्यक्षा.

इतिहासकार व जिल्ह्याच्या दृष्टीने येथील जुन्या काळातील मुर्तीची जतन होणे आवश्यक आहे.मंगळवेढ्याचा इतिहास तिथेच राहिला पाहिजे यासाठी.वस्तुसंग्रालय व्हावे म्हणून नागरिक आणि नगरपालिकेचा पुढाकार महत्वाचा आहे .
डॉ. माया पाटील, पुरातत्व विभाग प्रमुख सोलापूर विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com