Vidhan Sabha 2019 : ‘मंत्री सावंतांच्या खेळीमुळे माझी उमेदवारी कापली’  

shivsena.jpg
shivsena.jpg

पंढरपूर ः सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून पक्की असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. विद्यमान आमदार ऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या रश्मी बागल यांच्या गळ्यात शिवसेनेच्या उमेदवारीची माळ टाकलेली आहे. विद्यमान शिवसेना आमदाराला डावल्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनामा देऊ अशी धमकी दिली आणि करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची केली. मला एबी फॉर्म मिळत असतानाही सावंतांच्या खेळीमुळे माझी उमेदवारी कापली गेली असा आरोप शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेत निष्ठावंत वर झालेल्या अन्यायाला तोंड फुटलंय.

तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी मधून आलेल्या रश्मी बागल यांना दिल्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावर करमाळा पंचायत समिती आणि करमाळा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आणली आहे. यामुळे करमाळा मध्ये शिवसेनेची ताकद वाढली असताना ही नारायण पाटील यांना डावलल्या यामुळे करमाळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता रश्मी बागल यांचे काम न करण्याचा  इशारा दिलेला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले की करमाळ्यातील निष्ठावंत आनी कट्टर शिवसैनिक आणि पदाधिकारी हे नारायण पाटील यांच्या सोबत असतील या अशा परिस्थितीमुळे शिवसेनेची करमाळा विधानसभेची जागा धोक्यात असल्याचं दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com