येवलेवाडी फाट्यावर अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

अपघाताची नोंद कासेगाव पोलिसांत झाली आहे.

नेर्ले (सांगली) : आशियायी महामार्गावरील कासेगाव जवळ येवलेवाडी फाट्यावर थांबलेल्या टँकर ला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण जबर जखमी झाला आहे.गणेश वासुदेव मर्डेकर ( वय २३ रा.रामडोह वाई, जि. सातारा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.रमेश शिवराम कनप (रा.आचरे,ता.वाई ,जि. सातारा)गंभीर जखमी झाले. दुपारी चारच्या दरम्यान हा अपघात घडला.अपघाताची नोंद कासेगाव पोलिसांत झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,

आशियायी महामार्गावर येवलेवाडी फाट्यावर ट्रक क्रमांक (एन.एल.०१ एल.८०० )हा टायर गरम झाले म्हणून महामार्गावर बाजूला उभा होता.यावेळी दुचाकी क्रमांक (एम.एच.११सी.एम.३८५७)यावरून गणेश वासुदेव मर्डेकर व रमेश शिवराम कनप हे दोघे कासेगाव कडून कोल्हापूर च्या दिशेने चालले होते. येवलेवाडी फाट्याजवळ आल्यानंतर गणेश यांची दुचाकी कोल्हापूर कडे तोंड करून थांबलेल्या शाम्पूच्या टँकर ला ड्रायव्हर च्या बाजूला जोराची धडक दिली.यावेळी दुचाकी धारक गणेश मर्डेकर याला गंभीर मार लागला व तो जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेले रमेश शिवराम कनप जखमी झाले.यात दुचाकीचा पुढचा भाग चक्काचूर झाला होता.

हेही वाचा- देशाचीच सेवा: अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...! -

रमेश कनप यांना  येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अनावधानाने झालेल्या अपघातात गणेश मर्डेकर याला जीव गमवावा लागला.टँकर चालक ग्रामसेवक गया दिनपाल (वय ५२ रा मुंबई)याने कासेगाव पोलिसांत अपघाताची फिर्याद दिली. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जयकर उथळे तपास करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nerli sangli accident cas