ऑनलाइन पेमेंट करण्यास नेटिझन्सचा वाढतोय कल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

सातारा - नोटाबंदीमुळे बाजारपेठेत चलन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शहरातील व्यवहारही मंदावले. त्यावर मात करण्यासाठी व्यावसायिकांनी नेट बॅंकिंग, स्वाइप मशिन आदी गोष्टींवर भर दिला आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारे इंटरनेट कनेक्‍शन घेण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) महिनाभरात शहरात ३७ ब्रॉडबॅण्ड कनेक्‍शनची जोडणी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिन्यापूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर बॅंका, टपाल खाते आदी ठिकाणी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा देऊन नव्या नोटा घेण्यासाठी नागरिकांची बॅंकांमध्ये गर्दी झाली. नोटाबंदीच्या निर्णयाला महिना उलटून गेला तरीही अद्याप बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाकडूनही नेट बॅंकिंगला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयाला प्रतिसाद म्हणून पेट्रोल पंप, हॉटेल, रिसॉर्ट, वाहनांच्या शोरूम आदी ठिकाणी स्वाइप मशिन लावण्यावर व्यावसायिकांनी भर दिला आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी नेटिझन्सकडून विविध ॲप्सचा वापरा वाढलेला दिसतो. नेट बॅंकिंगसाठी आवश्‍यक असणारे इंटरनेट जोडणीसाठी बीएसएनएलकडे विशेषतः ब्रॉडबॅण्ड सेवा घेण्याचा कल ग्राहकांचा वाढला आहे. गेल्या महिन्याभरात सातारा शहरात सुमारे ३७ नवे ब्रॉडबॅण्डचे ग्राहक जोडले गेल्याची माहिती ‘बीएसएनएल’कडून देण्यात आली. 

Web Title: netizens priority to online payment