नेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ 

nevase
nevase

नेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या 'ढोल बजाव' आंदोलनास  सकाळी ११:वाजता प्रारंभ झाला. 

दरम्यान सुमारे 300 डफ, ढोल, ताशांचा दणदणाट व हातात पिवळे ध्वज घेवून असलेल्या हजारो तरुण-तरुणी व महिलांच्या "येळकोट.. येळकोट.. जय मल्हार..! च्या गगनभेदी जयघोषांनी नेवासे नगरी दणाणली. पिवळे ध्वज, पिवळे फेटे व पिवळ्या भंडार्‍याची उधळण यामुळे सर्वत्र रस्ते पिवळे दिसत असल्याने नेवासे शहराला आज सोन्याच्या जेजूरीचे रुपडे आले आहे.  

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात या प्रमुख मागणी बरोबरच धनगर समाजाला सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी, शेळ्या- मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे उपलब्ध करावी, धनगर समाजाच्या मुला-मुलींसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावी, शेळी- मेंढी विकास महामंडळास आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी, आरक्षनासाठीच्या आंदोलन प्रसंगी दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत या मागण्यांसाठी आज साडे आकरा वाजता मार्केट कमिटी ते नेवासे तहसील कार्येलाय अशा मोर्चाने 'ढोल बजाओ" आंदोलनास प्रारंभ झाला.याबरोबरच प्रत्येक गावातुन मोटारसायकल रॅली काढून या समाजाचे तरुण या आंदोलनात सहभागी झाले आहे.

आंदोलनादरम्यान नेवासे शहरात पोलिस उपधिक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे याच्या नेतृत्वाखाली सुमारे १४२ पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com