नेवासे पोलीसांकडून गोमांस जप्त, दोघांना अटक

सुनील गर्जे 
गुरुवार, 5 जुलै 2018

नेवासे : नॅनो कारमधून बेकायदेशीररित्या औरंगाबादकडे गोमांस घेवून जात असतांना नेवासे पोलिसांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा (ता. नेवासे ) येथे सापळा रचून दोघांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी 1 लाख 1800 रूपयांचा मुद्देमाल जपत केला आहे.

नेवाशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना गुप्तबातमीदाराकडून मिळालेल्या माहिती वरुन त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा (ता. नेवासे) येथे साध्या वेशातील पोलिसांचा सापळा रचून औरंगाबादच्या दिशेने जात असलेले नॅनो कार (MH 20 BY 3512)  हे वाहन अडवून तपासणी केली असता या वाहनात 120 किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी गोमास व नॅनो कार असा 1 लाख 1800 रूपयांचा मुद्देमासह शेख समीर शेख शाकिर (वय 45) राहणार सिमस नगर शहाणूरवादी औरंगाबाद व शेख रियाज शेख अब्दुल (वय 38) राहणार नूतन कॉलनी, औरंगाबाद यांना ताब्यात घेलते आहे.

याप्रकरणी नेवासे पोलिसांत वरील दोघा आरोपीन विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. नेवासे पोलिसांनी पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शन व सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून कटत्तलीसाठी जाणार्‍या अनेक गायी, बैलांची सुटका केली आहे.

Web Title: Nevase police confiscated beef, both arrested