नेवासे: आपघातात दोन ठार, तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

नेवासे - कंटेनर आणि टाटा कार यांच्या झालेल्या आपघातात दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला असून, दिघेजण गंभीर जखमी आहेत. हा आपघात रविवार (ता. 17) रोजी रात्री पावणेदोन वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळे बहिरोबा शिवारात झाला. याप्रकरणी शनिशिंगांनापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश वसंत तापकर (वय 37) मोरेश्वर दत्तात्रय दिक्षित (वय 38) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अमोल मदन जोशी, सचिन अरविंद राक्षे (सर्व राहणार पुणे) असे जखमींची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, औरंगाबादहून पुण्याकडे जात असलेला कंटेनर (EG 12 BV 5634) हा नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळे बहिरोबा (ता. नेवासे) शिवारात अचानक रस्त्याच्याकडेला थांबल्याने पाठीमागून येणारी टाटा कार (MH 14 GS 1429) हे वाहन धडकल्याने यातील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.

याप्रकरणी मंदार मोरेश्वर देशपांडे रा. लक्ष्मीनारायण अपारमेंट. पिंपरी चिंचवड यांनी शनिशिंगणापुर पोलिसांत दिलेल्या फिर्‍यादिवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: Nevase: Two people were killed and three injured in an accident