नेवाशात दोनलाख लीटर दुध संकलन थांबले

सुनील गर्जे  
मंगळवार, 17 जुलै 2018

नेवासे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध दरात वाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवार (ता. १६) रोजी नेवासे तालुक्यातील तब्बल 2 लाख 20 हजार लिटर दुधाचे संकलन थांबले. सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आंबादास कोरडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी त्यांच्या मुलांच्या हस्ते प्रवरासंगम (ता. नेवासे) येथील महादेव मंदिरातील नंदीला दुग्धभिषेक घालून आंदोलनास प्रारंभ केला. दरम्यान आंदोलकांना नेवासे पोलिसांनी ताब्यात घेवून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. 

शासनाने दुधास प्रतिलिटर 30 रुपये दर व पाच रु अनुदान द्यावे  या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळी प्रवरासंगम येथे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आंबादास कोरडे, विभागीय प्रवक्ते डॉ. अशोक ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी नंदीला दुग्धभिषेक घातला. दरम्यान नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी आंदोलकांना आंदोलन्स्थालीच ताब्यात घेत नेवासे पोलीस ठाण्यात काहीकाळ नजर कैदेत ठेवून नंतर सोडून देण्यात आले. दुध दरवाढ आंदोलनामुळे नेवासे तालुक्यात 3 लाख 50 हजार लिटर दुध संकलनापैकी 2 लाख 20 हजार लिटर दुधाचे संकलन थांबले. 

दरम्यान आंदोलकांनी सहयाक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या आंदोलकांना सहकार्ये करा, विनाकारण त्रास देवू नये असे निवेदन दिले. आंदोलनात खेडले काजळीच्या सरपंच निर्मला ढगे, सकस दूध संकलन केंद्राचे बापूसाहेब डावखर, भीमराज शिंदे, गणेश भगत, यश डावखर, स्वागत चव्हाण, राजेंद्र बोरुडे, ज्ञानोदय गवळी, विकास गवळी सहभागी झाले. 

दुध संकलन केंद्रांवर शुकशुकाट
नेवासे तालुक्यात अमूल, सोमुल, प्रभात, एस. आर. थोरात, कृष्णाई, पतंजली, जय भवानी, माउली, पारस व नेवासे तालुका दुध संघ यांचे दुध संकलन केंद्रे आहेत. आंदोलनामुळे आज यासर्व दुध डेअरीच्या दुध संकलनावर शुकशुकाट होता. आंदोलकांच्या धास्तीने काहींनी भल्या पहाटेच संकलन केंद्रावर दुध घातले मात्र दुध घेवून जाण्यासाठी वाहने येणार नसल्याने संकलन केंद्र चालकांनीहि संकलन आटोपते घेतले. 

शासनाने शेतकर्यांचा अंत पाहू नये, त्वरित दूध उत्पादकांना पाच रुपये लिटर मागे अनुदान द्यावे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल व होणार्या परिणामास शासनच जबाबदार राहील.
-अंबादास कोरडे  प्रदेश उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Nevasha stopped the collection of milk