सांगली : वाळवा तालुक्यात आज नव्या २५ कोरोना रूग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

नियंत्रणात असणाऱ्या वाळवा तालुक्याची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्यात आज सकाळच्या टप्प्यात 10 गावांमधील सुमारे 25 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. 

गेले काही दिवस नियंत्रणात असणाऱ्या वाळवा तालुक्याची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या 229 वर पोचली आहे. 

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये केदारवाडी येथील 9 जण पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये तीन वर्षीय मुलगा आणि त्याच वयाच्या मुलीचा समावेश आहे. अन्य दोन महिला आहेत. वाटेगाव येथील 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही तीन महिलांचा समावेश आहे.

हे पण वाचाएकेकाळी या गावात होता दुष्काळ, पण आज प्रत्येकाच्या घरासमोर आहे रुबाबदार बुलेट 

इस्लामपूर शहर व काळमवाडी येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत तर रेठरे हरणाक्ष, नेर्ले, सुरुल, बागणी, वाळवा व कुरळप येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या दहा गावांमध्ये रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 25 corona positive patients in sangli walwa taluka