होय, आम्ही करून दाखवलं...

congress
congress

सोलापूर : होय, आम्ही करून दाखवले... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरु केलेले हे अफलातून कॅम्पेन सध्या लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियाचा वापर किती प्रभावी होऊ शकतो याची जाणीव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना झाली आहे. त्याचाच एक भाग या कॅम्पेनच्या माध्यमातून तरुणाईला जोडला गेला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनिष गडदे यांच्या संकल्पेनेतून या कॅम्पेनची कार्यवाही सुरु झाली आहे. काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनेच दिली नाहीत तर, प्रत्यक्षात कामे केली आहेत. त्याचा कधीही बोलबाला केला नाही. भाजपच्या नेत्यांनी मोठ-मोठी आश्वासने दिली, प्रत्यक्षात एकही काम केले नाही, उलट काँग्रेसच्या कालावधीत झालेल्या कामांची उद्घाटने केली हे बिंबवण्याचा प्रयत्न या कॅम्पेनमधून केला जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नाने झालेली उजनी-सोलापूर जलवाहिनी, विमानतळ, एनटीपीसी, पॅावरग्रीड, सीमा सुरक्षा बलाचे प्रशिक्षण केंद्र, सोलापूर विद्यापीठाची स्थापना, इंटरसिटी रेल्वे, चौपदरी रस्ते याची माहिती या कॅम्पेनद्वारे दिली जात आहे. भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्या कारकिर्दीत लक्षवेधी असे एकही काम झाले नाही. त्यामुळे कांग्रेसने टाकलेल्या पोस्टला प्रतित्युर काय द्यावे असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना सध्या सतावत आहे. 

सोशल मिडीयावर जुगलबंदी
याच कॅम्पेनअंतर्गत सोलापूरच्या शासकीय रुग्णालातील नूतन इमारतीबाबत गडदे यांनी पोस्ट केली होती. त्यावर, भाजपच्या समर्थकांनी रुग्णालयातील दूरवस्थेची छायाचित्रे पोस्ट केली, त्याचवेळी आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख हे सोलापूरचेच आहेत याचा त्यांना विसर पडला असावा. त्यामुळे स्वतःच्याच पक्षाच्या मंत्र्यांची कामगिरी कार्यकर्त्यांनीच दाखवून दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com