नव्या वर्षात येणार आकर्षक गॅस सिलिंडर

नव्या वर्षात येणार आकर्षक गॅस सिलिंडर

कोल्हापूर : नवीन वर्षात वजनाने हलके, रंगीबेरंगी, आकर्षक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्फोट न होणारे गॅस सिलिंडर तुमच्या स्वयंपाकघरात पाहायला मिळतील. हिंदुस्थान पेट्रोलियमने हे नवीन गॅस सिलिंडर तयार करून घेतले असून, जूनमध्ये किंवा त्या अगोदर पुणे व अहमदाबाद येथील नागरिकांच्या घरांत असे सिलिंडर पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.


सध्या वापरले जात असलेले जुने लोखंडी गॅस सिलिंडर वजनाने खूपच जड आहेत. त्याचा स्फोट होण्याची शक्‍यता अधिक असते. उंच इमारतीत ते वाहून नेणे खूपच अवघड जाते. पण हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने याबाबत पुढचे पाऊल टाकले असून, वजनाने हलके, रंगीबेरंगी, आकर्षक आणि स्फोट होणार नाही, असे सिलिंडर बनवून घेतले आहेत. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जूनपूर्वी किंवा त्याअगोदरच ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.


प्रथम पुणे आणि अहमदाबाद येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यानंतर वर्षभरातच सर्वच ग्राहकांच्या स्वयंपाकघरांत हे नवीन सिलिंडर पोचतील, अशी शक्‍यता आहे.
नवे सिलिंडर दोन, पाच आणि दहा किलोचे असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. सध्याच्या जुन्या सिलिंडरची किंमत 1 हजार 400 रुपयांच्या आसपास आहे. नवीन सिलिंडरची किंमत 2 हजार 400 किंवा अडीच हजार रुपयांच्या आसपास असेल. जुने सिलिंडर जमा करून अवघे एक हजार रुपये भरल्यानंतर नवे सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहेत.

गॅस चोरीचे प्रकारही थांबणार
नवीन सिलिंडरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात गॅस भरला आहे किंवा नाही हे बाहेरून दिसणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर चोरीचे प्रकारही थांबणार आहेत. जड सिलिंडर हाताळणे महिलांना अवघड जाते. नवीन सिलिंडर हलके असल्याने ते सहजपणे हाताळता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com