कचऱ्या कोंडाळ्यात नवा कोरा जनरेटर 

डॅनियल काळे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 3 जानेवारी 2017

कोल्हापूर - कसबा बावडा येथील झूम प्रकल्पातील कचऱ्याचा महाडोंगर खाली करण्याचे काम सुरू असताना यामध्ये सापडलेला 35 लाखांचा नवा कोरा जनरेटर आता रिकामा झाला आहे. दोन वर्षे हा जनरेटर वापराविना पडूनच आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झाकलेल्या या जनरेटरचा वापर आता तरी योग्य ठिकाणी होईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. एका बाजूला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जनरेटरची आवश्‍यकता असताना हा जनरेटर दोन वर्षे कोंडाळ्यातच अडकल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल लोकांतून संताप व्यक्त होत आहे. 

"आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी महापालिकेची अवस्था झाली आहे. एका बाजूला यंत्रणा नाही, म्हणून सुविधा मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जेथे यंत्रणा आहे तेथेही सुविधा नाही, असा प्रकार सुरू आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल, पंचगंगा रुग्णालयाच्या ठिकाणी योग्य क्षमतेचे जनरेटर नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सोय-सुविधांमध्येही अडथळे निर्माण होतात. शस्त्रक्रियाही लांबवाव्या लागतात. जयंती नाल्यातील पाणी वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर केवळ जनरेटरअभावी नाल्याद्वारे पंचगंगा नदीत मिसळते. 

केशवराव भोसले नाट्यगृहातही मध्यंतरी वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर एसीच्या सुविधेमध्येही अडथळे येत होते. या सगळ्या समस्या दोन वर्षांपासून आपल्याकडे आहेत; पण दुसऱ्या बाजूला महापालिकेने खरेदी करून झूम प्रकल्पावर ठेवलेला जनरेटर मात्र दोन वर्षे कोंडाळ्यातच अडकला होता. विशेष म्हणजे 35 लाख रुपयांचा हा जनरेटर वापराविना पडून होता. त्यावर कचऱ्याचे डंपर रिकामे होत होते. दोन दिवसांपूर्वी मात्र हा जनरेटर या ढिगाऱ्यातून रिकामा झाला. आता तरी या जनरेटरचा वापर कोठे होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

सोयी-सुविधांचा खोळंबा 
महापालिकेच्या अनेक मशिनरी वापराविना पडून आहेत. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीनही वापराविना पडून आहे. रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे याचा वापर होत नाही. रेडिओलॉजिस्टचा पगार महापालिकेला परवडत नाही. ठोक मानधनावर काम करायला कोणी रेडिओलॉजिस्ट मिळत नाही. त्यामुळेदेखील हे मशीन पडून आहे. यंत्रणा, मशिनरी असूनही ती वापराविना पडून असल्याने सोयी-सुविधांचा खोळंबा होत आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""हा जनरेटर महापालिकेच्या मालकीचा नाही, तो झूम प्रकल्पवाल्यांचा आहे.'' 

Web Title: new generator in garbage