प्रीपेड ग्राहकांसाठी नवी योजना

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 22 मार्च 2017

सातारा - खासगी दूरसंचार कंपन्यांच्या योजनांना टक्कर देण्यासाठी पुन्हा एकदा भारत संचार निगम लिमिटेडने चंग बांधला आहे. ३३९ रुपयांमध्ये (स्पेशल टेरीफ व्हॉउचर) २८ दिवसांसाठी ५६ जीबी इंटरनेट डाटा, बीएसएनएल नेटवर्कमध्ये अमर्याद संभाषण व अन्य नेटवर्कमध्ये ७०० मिनीट मोफत संवाद साधता येणार आहे. 

रिलायन्स, एअरटेल या खासगी कंपन्यांद्वारे बाजारात विविध सवलतींच्या योजना आणल्या जात आहेत. या कंपन्यांच्या स्पर्धेत कायम अग्रेसर राहून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बीएसएनएल नेहमीच प्रयत्न करीत आहे. बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांसाठी नुकत्याच विविध योजना बाजारात आणल्या होत्या. त्यापाठोपाठ आता प्रीपेड ग्राहकांसाठी डबल डाटा योजना, अमर्याद बोला ही अनोखी योजना केवळ ३३९ रुपयांमध्ये बाजारात आणली आहे. कोणत्याही प्रीपेड ग्राहकाने २८ दिवसांसाठी असलेले हे विशेष व्हाऊचर घेतल्यास त्यास प्रतिदिन दोन जीबी इंटरनेट डाटा मिळत आहे. विशेष म्हणजे ब्रॉऊझिंग करताना वेग मर्यादेचे कोणतेही बंधन कंपनीद्वारे ठेवलेले नाही.

याचबरोबर ग्राहकास बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये मोफत अमर्याद बोलणे, अन्य नेटवर्कमध्ये प्रतिदिन २५ मिनीट मोफत बोलता येईल. त्यानंतर प्रती मिनीट २५ पैसे इतका कमी दर आकारला जाणार आहे. यापूर्वी या योजनेत केवळ एक जीबी इंटरनेट डाटा, तसेच केवळ बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये मोफत बोलण्याची सुविधा होती. आता इंटरनेट डाटा दुप्पट झाला असून, अन्य नेटवर्कमध्ये ही मोफत संवाद साधणे शक्‍य झाले आहे. प्राथमिक टप्प्यात या योजनेची मुदत जूनअखेर (९० दिवस) वैध असल्याचे बीएसएनएलमधून स्पष्ट केले आहे.

Web Title: new scheme for prepaid customer