नवमतदार नोंदणीत सहा हजार अर्ज

New-Voter-Registration
New-Voter-Registration

सातारा - एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरू झालेल्या नवमतदार नोंदणीसाठी पहिल्याच रविवारी सहा हजार ५६० नागरिकांनी मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट व्हावे, यासाठी अर्ज भरले. ‘कॅच देम यंग’ हा अजेंडा ठेवून आगामी काळात ३६ हजार नवमतदारांची नोंदणी करण्याचा प्रयत्न जिल्हा निवडणूक शाखेचा आहे. दरम्यान, आजपर्यंत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तीन केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) गुन्हे दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नवीन मतदारांची व मतदार नोंदणीपासून वंचित मतदारांची नोंदणी करण्यासाठी ऑक्‍टोबरमधील चारही रविवारी जिल्ह्यातील दोन हजार ९७० मतदान केंद्रांवर सर्व बीएलओ यांच्या उपस्थितीत मतदार नावनोंदणीची विशेष मतदार मोहीम राबवली जाणार आहे. केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर हजर राहून नवीन नाव दाखल करण्यासाठी नमुना क्रमांक सहा (रंगीत फोटो, रहिवाशी पुरावा दाखला, वयाचा पुरावा), यादीतील नाव कमी करण्यासाठी नमुना क्रमांक सात, यादीतील दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक आठ, स्थलांतराकरिता नमुना क्रमांक आठ (अ) असे विविध प्रकारचे अर्ज भरून घेणे आवश्‍यक आहे. 

सात ऑक्‍टोबरच्या नोंदणी मोहिमेस जिल्ह्यातील नवमतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत सातारा जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण आठ हजार ७०२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी सहा हजार ५६० अर्ज हे नुमना क्रमांक सहा म्हणजेच मतदार यादीत नावनोंदणीसाठीचे होते. या विशेष मोहिमेदिवशी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आणि उपजिल्हाधिकारी पूनम मेहता यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांना भेटी देऊन ‘बीएलओ’ व उपस्थित मतदार यांना मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com