नववर्ष स्वागतासाठी खुलली गिरिस्थाने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

महाबळेश्‍वर - नाताळचा हंगाम आणि नववर्षाचे स्वागताची संधी साधणाऱ्या देशभरातील पर्यटकांनी महाबळेश्‍वर, पाचगणी या गिरिस्थानांवर गर्दी केली आहे. गिरिस्थानांवर वाढलेली गजबज या शहरांच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत आहेत. प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटक गर्दी करीत असून, नौकाविहारासह घोडेसवारीची मजा लुटण्याबरोबरच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे. 

महाबळेश्वर या पर्यटनस्थळी महाराष्ट्रासह देशभरामधून लाखो पर्यटक दाखल होत आहेत. नाताळच्या सुट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरनगरी सज्ज झाली आहे. पर्यटकांच्या गर्दीने हे ठिकाण फुलून गेले आहे. आज पर्यटकांच्या स्वागतासाठी मुख्य बाजारपेठही सज्ज झाली असून येथील प्रसिद्ध वस्तूंच्या, पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. येथील प्रसिद्ध चपल्स, चणे, जॅम, जेली खरेदीबरोबरच लाल, चुटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठीही गर्दी होताना दिसत आहे. 

महाबळेश्वरमधील केट्‌स पॉइंट, ऑर्थरसीट, लॉडविक, मुंबई पॉइंट या प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरामध्येही दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. चणे, जाम, जेली, गरमागरम कणीस, मका पॅटीस व येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. ऐन थंडीत पर्यटक येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईसक्रीम, आईस गोळ्याच्या गाड्यांवर गर्दी करीत आहेत. वेण्णालेक, मुंबई पॉइंट या परिसरामध्ये घोडेसवारीचा आनंद लुटला जात आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. हॉटेल्स, लॉजसाठी पर्यटक विविध साइट्‌सच्या माध्यमातून ‘ऑनलाइन बुकिंग’ चा वापर करताना दिसत आहेत. 

महाबळेश्वरचे वैभव असलेल्या वेण्णालेकला चौपाटीचे स्वरूप आले आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला आहे. पर्यटक नौकाविहारासोबतच चटपटीत पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

Web Title: New Year Welcome Mahabaleshwar Tour