नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक भ्रष्ट: संजय सुखधान

newase
newase

नेवासे : नगर पंचायत निवडणुकीत नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देत सेवा करायची संधी दिली, मात्र नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांच्या टक्केवारीच्या माध्यमातून चालवलेला भ्रष्ट कामकाजामुळे आपण तो विश्वास टिकवून ठेवू शकलो नाही, यामुळे वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या नगरसेविका शालिनी सुखधान यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर घोषणा काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी नगरसेविका शालिनी सुखधान यांच्या उपस्थितीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

संजय सुखाधान म्हणाले, नगर पंचायतच्या निधीतून शहरात आत्तापार्येंत झालेल्या प्रत्येक विकास कामांत संबंधित ठेकेदारांकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांसह सुखधान यांनीही दहा टक्के कमिशन घेतल्याचा आरोप करत याचे माझ्याकडे पुरावे आहेत. हा जनतेच्या विश्वासाला दिलेला तडा असून पदाचा गैरवापर केल्याने याची चौकशी होऊन सर्वांवरच कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणीही त्यांनी केली. नगर पंचायातीत निवडणूक झाल्यापासून आत्तापर्येंत 90 हजार रुपयांचे सर्वांनीच कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक शालिनी सुखाधान यांनीही ते घेतले असल्याने सुखाधांसह नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांवर कारवाई व्हावी. 

शालिनी सुखाधान म्हणाल्या, "नगर पंचायतमध्ये आज झालेल्या बैठकीत मी शहरातील सध्या शौचालय म्हणून उपयोग होत असलेली कडू पाटील चौकास 'संविधान चौक' असे नामकरण करावे अशी मी मागणी केली होती. मात्र नगरसेवक सचिन वडागळे वगळता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी यास विरोध दर्शविला आहे. नामांतरा नंतर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्या नेतृत्वाखाली वैयक्तिकरित्या शासनाकडून ५० लाखाचा निधी उपलब्ध करून या चौकाचे सुशोभीकरणासाठी करण्याचा आमचा विचार होता. मात्र या मनुवाद्यांनी 'संविधान' या शब्दास विरोध केल्याने या मनुवादी विचारांच्या बरोबर काम करण्याची माझी इच्छा नसल्याच्याही त्या म्हणाल्या.

दरम्यान नगरसेविका शालिनी व संजय सुखधान यांच्या आरोपाने नेवाशे शहरासह तालुक्यातील वातावर ढवळून निघाले असून त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांत खळबळ उडाली आहे.   

पक्षपातळीवर गंभीर दाखल घेण्याची शक्यता
नेवासे नगर पंचायतची नगराध्यक्ष, उपाध्यक्षसह सतरा नगरसेवक तर दोन स्वीकृत असे असे एकूण एकोणवीस नगरसेवक आहेत. त्यात भाजपाचे नगराध्यक्षसह सात नगरसेवक आणि उपनगराध्यक्षसह नऊ नगरसेवक क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे असून एक नगरसेवक राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा तर भाजप-क्रांतिकारी यांचे प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक आहे. सुखधान यांनी थेट चौकात जनतेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले आरोप गंभीर असून यांची पक्षपातळीवर गंभीर दाखल घेण्याची शक्यता आहे.     

जिल्हाधिकार्यांकडे राजीनामा देणार : शालिनी सुखधान
कोट- "नगर पंचायतीत विविध कामांत झालेल्या भ्रष्टाचारांच्या पुराव्यांसह मी तीन-चार दिवसांत  जिल्हाधिकारी यांच्याकडे माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहे. असल्याचे कॉंग्रेस नगरसेविका शालीनी सुखधान यांनी सांगीतले. 

कोणाचाही विरोध नाही : संगीता बर्डे
"चौकाला संविधान नाव देण्याला विरोध केलेला नाही. तर चौकाला अगोदरच औंदुबर हे नाव असल्यामुळे स्थानिक नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे नगराध्यक्षा संगिता बर्डे म्हणाल्या. 

दबावतंत्राचा वापर : नंदकुमार पाटील 
"चौकाच्या नामकरणाविषयी कोणीही विरोध केलेला नसतांनाही दबावतंत्राचा वापर होत आहे. तसेच ठेकेदाराकडून सर्वांनी पैसे घेतल्याची माहिती सुखधान यांच्याकडून आजच आम्हाला समजली. असे उपनगराध्यक्ष नंदकुमार  पाटील म्हणाले.

आरोपात तथ्य नाही : सचिन नागपुरे
"सुखधान यांनी केलेले आरोपात कोणतेही तथ्य नाही, सर्व व्यवहार आता ऑनलाईन व पारदर्शी असल्याने कुठे भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे भाजपचे गट नेते सचिन नागपुरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com