नवविवाहित दांपत्याचा आगीत होरपळून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

प्रशांत व काजल यांचे 5 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. आगीत भाजल्याने काजल काल सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आली. आगीत होरपळल्याने पती प्रशांतही गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला.

कोल्हार - अवघ्या पाच दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथील नवदांपत्याचा काल सायंकाळी आगीत होरपळून मृत्यू झाला. प्रशांत श्रावण वाघमारे (वय 32) व पत्नी काजल वाघमारे (वय 22) अशी त्यांची नावे आहेत. आगीचे कारण समजले नाही. 

प्रशांत व काजल यांचे 5 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. आगीत भाजल्याने काजल काल सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आली. आगीत होरपळल्याने पती प्रशांतही गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला.

याबाबत रामनाथ बाबूराव साळवे (रा. दाढ बुद्रुक) यांनी लोणी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीदरम्यान प्रवरा रुग्णालय व वाघमारे यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रशांत माध्यमिक शाळेत शिक्षक होता. 

Web Title: newly married couple death in fire

टॅग्स