शेततळ्यात बुडून नवविवाहितेचा मृत्यू

राजकुमार शहा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मोहोळ : पोहावयास गेलेल्या एका आठरा वर्षीय नवविवाहितेचा शेततळ्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना आज शनिवार ता 28 रोजी सकाळी साडे आकरा वाजता बैरागवाडी ता मोहोळ येथे घडली.

माया राहुल व्यवहारे (रा. बैरागवाडी) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माया शनिवारी पोहावयास म्हणून नारायण व्यवहारे यांच्या शेतातील शेततळ्यात गेली.

तिने शेततळ्यात उडी मारली, ती वर आलीच नाही. तिला तातडीने शेततळ्यातून वर काढले व उपचारासाठी आष्टी येथील खाजगी दवाखान्यात नेले. तपासणीनंतर  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मायाचा विवाह दोन महिन्यांपूर्वी झाला होता. या घटनेची खबर नारायण तुळशिराम व्यवहारे (रा बैरागवाडी) यांनी मोहोळ पोलिसांत दिली. तपास हवालदार शेख करीत आहेत.

Web Title: Newly married women drowned in Mohol

टॅग्स