आरक्षणाबाबतच्या 'त्या' बातम्या खोट्या : अण्णा हजारे

The news about reservation is false says Anna Hazare
The news about reservation is false says Anna Hazare

राळेगणसिद्धी : आरक्षणाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या समर्थनार्थ मी कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच येत्या सहा सप्टेंबरपासून मी आरक्षणाविरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या पूर्णतः खोट्या असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हजारे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, की गेल्या दोन दिवसांपासून माझ्या नावाने तसे संदेश कोणीतरी पसरवत आहे. त्या संदेशाशी माझा काहीही संबंध नाही. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार समता निर्माण व्हावी, या हेतूने आरक्षणाची तरतूद केली.

समतेसाठी आरक्षण असणे आवश्यकही आहे. पण अलीकडच्या काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या प्रांतात जी स्थिती निर्माण झाली आहे. ती पाहता या मुद्द्यावरून जातीय सलोखा धोक्यात येईल. अशा एखाद्या मुद्यावरून सामाजिक अशांतता निर्माण होऊन देशाचे तुकडे होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा संवेदनशील मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी व समोपचाराने असे प्रश्न सोडविण्यात यावेत असे वाटते.

शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. 23 मार्चला दिल्लीत रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलनप्रसंगी दिलेल्या लेखी आश्वासनाचे पालन न केल्यामुळे मी येत्या दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत कोणतेही आंदोलन करण्याचा प्रश्नच नाही. म्हणून समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात येऊ नयेत, अशी विनंतीही शेवटी हजारे यांनी पत्रकात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com