बातमी सांगलीची, पाऊसपाण्याची अन्‌ पेरणीची

crop news
crop news

सांगली ः जिल्ह्यात हलक्‍या पावसावर खरिपाच्या 75 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील आठ दिवसांत हा आकडा शंभर टक्के पार करेल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. शिवारात पाणी उभे राहिले तरच विहिरी, कुपनलिकांतील पाणीसाठा वाढणार आहे. सध्या खरिप पिकांसाठी पोषक वातावरण असले तरी सर्वत्र दमदार पाऊस कधी येणार, याकडे डोळे लागले आहेत. 

गेल्या काही वर्षात जून महिन्यात पावसाने चकवाच दिला आहे. जूनमध्ये अगदी तूरळक पाऊस पडतो. यावर्षीची जून महिन्याची आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजे 131 टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी सरासरी 129 मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सरासरी 135 मिलीमीटर पाऊस होतो. पहिल्या आठवड्यात आतापर्यंत 17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, ""गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती चांगली आहे. एकदा पेरण्या झाल्या की त्याला रिमझिम पाऊसच उपयोगी असतो. पानावरून तो मूळापर्यंत पोहचतो. पिकाच्या वाढीसाठी तो उपयुक्त आहे. पाणी होण्यासाठी जोराचा पाऊस आवश्‍यक असतो. तो या महिन्यात लवकरच पडेल, अशी अपेक्षा करूया.'' 


जिल्ह्यात भात लागवड 14 हजार 558 हेक्‍टर, ज्वारी 32 हजार, 311 हेक्‍टर, बाजरी 35 हजार 716 हेक्‍टर, मका 27 हजार 684 हेक्‍टर, कडधान्य 25 हजार हेक्‍टर, भूईमूग 23 हजार 791 हेक्‍टर तर सोयाबीन 34 हजार 776 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे क्षेत्र 1 लाख 11 हजार 945 हेक्‍टर आहे. आडसाली उसाची लागवड 14 हजार 918 हेक्‍टर झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com