वृत्तपत्र विक्रेत्यांचं ठरलं...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची सोलापुरात कार्यकारिणी बैठक
- कल्याणकारी योजनांचा लवकरच सरकारला सादर करणार अहवाल
- आक्रमक व संघटितपणे करणार पाठपुरावा

सोलापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाईल. तो स्वीकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी संघटनेतर्फे आक्रमक व संघटितपणे पाठपुरावा करू, असा निर्धार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.

अरे वा! १४ वर्षात एवढ्याना मिळाले जीवदान 

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची शनिवारी (ता. 9) सोलापुरात बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार हे होते. यावेळी कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सल्लागार शिवगोंड खोत, पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सचिव रघुनाथ कांबळे, विनोद पन्नासे, संचालक मारुती नवलाई आदी उपस्थित होते.

'या' शहरातील मिश्रभाषेची नव्यांनाही पडतेय भूरळ

श्री. पवार म्हणाले, ""शहराबरोबरच ग्रामीण भागातील एजंटांचे प्रश्‍नही सोडविण्यासाठी राज्याची संघटना प्रयत्न करेल. राज्य शासनाच्या असंघटित कामगार कल्याण मंडळ अंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी विविध योजना राबवण्यासाठी स्थापन केलेल्या अभ्यास समितीचा अहवाल लवकरच शासनाला सादर होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष श्री. पाटणकर यांनी याप्रसंगी दिली. सोलापुरात आलेल्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले यांनी केले. बैठकीचे नियोजन सोलापूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शहराध्यक्ष शिवलिंग मेडेगार व पदाधिकाऱ्यांनी केले.

बळीराजाच्या मुलांना परिक्षा शुल्क माफी

कोण काय म्हणाले...
- वृत्तपत्र विक्रेता संघटनेची सभासद संख्या वाढविण्याची गरज : बालाजी पवार
- शहर व ग्रामीण असा भेदभाव न करता यापुढे समान कमिशन व पुरवणी भरणावळ मिळावी : विकास सूर्यवंशी
- ग्रामविकास विभागास वृत्तपत्रांच्या स्टॉलला संरक्षण देण्याबाबत शासन आदेश काढावा : संघटना
- स्थानिक आमदारांच्या माध्यमातून मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करूयात : विनोद पन्नासे
- राज्य संघटनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त राज्यपातळीवरील आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार सुरू करावा : मारुती नवलाई

संघटन मंत्रिपदी पाटणकर यांची निवड
अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या संघटन मंत्रिपदी सुनील पाटणकर यांची निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांचा गजरात मंजूर करण्यात आला. तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून मुंबईचे संजय पावसे यांची निवड झाली. राज्य अधिवेशन 2020ला सांगलीत होणार असून महापुराच्या संकटानंतरही सांगलीकरांनी अधिवेशन आयोजित केल्याबद्दल सर्वांनी आभार मानले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newspaper vendors decided