मंगळवेढा - दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणा कोलमडली
मंगळवेढा - सातवा वेतन आयोग, अनुकंपा भरती, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचार्यांच्या सर्वच संघटनांनी संपात शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणा कोलमडली. ग्रामीण भागातून शहरात विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना या संपाचा फटका बसल्याने रिकाम्या हाती घराकडे परतावे लागत आहे.

राज्यातील शासकीय कर्मचार्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्याबाबत शासन उदासीन आहे. कोणत्याही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राज्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांनी संप पुकारला. यात शिक्षक सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा सुट्टी मिळाली मुख्यमंत्र्यांच्या जाहीर घोषणेनंतरही शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांनी सरकारच्या विरोधात जात संप करण्याचा निर्धार केला असल्याने मंगळवारपासून प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली.
त्यामुळे महसूल, कृषी, पंचायत समितीसह, शिक्षक देखील संपात सहभागी असल्याने ग्रामीण जनतेचे हाल झाले.