विश्‍वास ठेवा! संस्था नोंदणी होते फक्त 53 रुपयांतच

अशोक मुरूमकर 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था व फाउंडेशनची नोंदणी करण्यासाठी व संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयांत धर्मादाय उपायुक्त, सहायक धर्मादाय आयुक्त यांच्यासह इतर कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी काम पाहतात.

सोलापूर : सामाजिक कार्यात सध्या अनेकजण सक्रिय आहेत. अनेक तरुण बहुउद्देशीय संस्था काढण्याच्या प्रयत्नात असतात, तर काहीजण "नको त्या किचकट बाबीत पडायला' असं म्हणून जे काही सामाजिक काम करायचे किंवा मदत करायची ती दुसऱ्या एखाद्या संस्थेला करतात. काहीजण संस्था नोंदणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जातातही. केवळ संस्था नोंदणीबद्दल माहिती नसल्याने अनेकजण हजारो रुपये घालवतात आणि त्यात वेळही घालवावा लागतो. मात्र, तुमचा विश्‍वास बसणार नाही की, संस्था नोंदणी अवघ्या 53 रुपयांत होते. यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तुम्हाला मदतही करतात. मात्र त्यांच्यापर्यंत एजंटाशिवाय पोचायला हवे. 

Image may contain: one or more people

हेही वाचा : मूल दत्तक घ्यायचे आहे, तर मग अशी आहे प्रक्रिया 
धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी आवश्‍यक... 

ग्रामीण व शहरी भागात सध्या अनेक स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था, फाउंडेशन अशा अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत असतात. एखादी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी संस्था पुढाकार घेतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण देणे, वाचनालये असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी संस्था पुढे येतात. त्यासाठी त्यांना मदत हवी असते आणि त्यामुळे संस्थेला कायदेशीररीत्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करणे आवश्‍यक असते. 

No photo description available.

हेही वाचा : पॅनकार्ड काढायचे आहे, तर कशी आहे प्रक्रिया वाचा 
येथे असते कार्यालय... 

स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय संस्था व फाउंडेशनची नोंदणी करण्यासाठी व संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयांत धर्मादाय उपायुक्त, सहायक धर्मादाय आयुक्त यांच्यासह इतर कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी काम पाहतात. महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय मुंबईत आहे. संजय ग. मेहरे हे सध्याचे धर्मादाय आयुक्त आहेत. संस्थेसंबंधित सर्व कामकाज मुंबई येथूनच चालते. 

Image may contain: text

हेही वाचा : अवघडचंय! कामाचा व्याप 383 गावांचा अन्‌ कर्मचारी फक्त 21 
संस्था नोंदणीसाठी हे आहे आवश्‍यक 

कोणत्याही स्वयंसेवी संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्ज करणे आवश्‍यक आहे. याचा नमुना https://charity.maharashtra.gov.in/Portals/0/Files/Societies%20Registrat... या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मराठीमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यात "प्रणाली मार्गदर्शन'मध्ये न्यास नोंदणी येथे संस्था नोंदणीचा अर्ज उपलब्ध आहे. त्याची प्रिंट काढूनही अर्ज करता येऊ शकतो, असे सोलापुरातील सहायक धर्मादाय आयुक्तांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा : तांत्रिक चुकीमुळे..! 
ही कागदपत्रे आवश्‍यक 

संस्था नोंदणी करण्यासाठी किमान सात सदस्य आवश्‍यक असतात. नोंदणी करताना सर्व सदस्यांची ओळखपत्रे आवश्‍यक असतात. त्यात 

No photo description available.

  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • मतदान ओळखपत्र 
  • ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र 
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी एक स्वत: ऍटेस्टेड केलेले) 

याशिवाय पत्त्याचा पुरावा म्हणून लाइट बिल, पॅन कार्ड, अर्ज करणाऱ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो व सदस्यांची मेल आयडी, मोबाईल क्रमांक व व्यवसाय याची यादी. 
 
ऑनलाइन नोंदणी... 
संस्था नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो. मात्र, सध्या ऑनलाइन अर्ज करण्याकडे नागरिकांचा कल आहे. अर्ज पूर्ण तपासून झाल्यानंतर काही ठिकाणी त्याच दिवशी किंवा सात दिवसांच्या आत संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जात असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातून सांगितले जात आहे. 
 

No photo description available.

थेट संपर्क साधा 
संस्था नोंदणी करण्यासाठी नियमानुसारच शुल्क घेतले जाते. याची सर्व माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणीही विनाकारण पैसे न देता थेट कार्यालयात संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाचा वापर करून संस्थेची नोंदणी करावी. काही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, असे कार्यालयाच्या वतीने सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The NGO registered for only 53 rupees