दरोडेखोरांच्या हल्ल्यात दांपत्यासह चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

निघोज - म्हसे (ता. पारनेर) येथे मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात पती-पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाली. दरोडेखोरांनी पन्नास हजार रुपये आणि पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. शेजारच्या घरातूनही सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले.

म्हसे येथे मदगे वस्तीवर गणपत लक्ष्मण मदगे यांच्या घरावर मध्यरात्री दीडच्या सुमारास सहा जणांनी दरोडा टाकला. मदगे यांच्यासह त्यांचा मुलगा आनंदा, दुसरा मुलगा आणि पत्नी अंजनाबाई यांनाही मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी घरातील पन्नास हजार रुपये रोख व पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दरोडेखोरांनी नंतर तेथून जवळच असलेल्या रमेश शंकर कोरेकर यांच्या घरी दरोडा टाकला. तेथेही कोरेकर कुटुंबीयांना मारहाण करीत चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन दराडेखोर पसार झाले.

Web Title: nighoj nagar news 4 injured in robber attack