हिंदू पाकिस्तान हाच सनातन्यांचा मनसुबा - निखिल वागळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

इस्लामपूर - सनातन्यांची डोकी फिरली असून, त्यांच्यात आणि आयसिसच्या दहशतवाद्यांमध्ये कोणताच फरक नाही. हिंदू पाकिस्ताननिर्मिती हाच त्यांचा मनसुबा असल्याची टीका निखिल वागळे यांनी केली.

इस्लामपूर - सनातन्यांची डोकी फिरली असून, त्यांच्यात आणि आयसिसच्या दहशतवाद्यांमध्ये कोणताच फरक नाही. हिंदू पाकिस्ताननिर्मिती हाच त्यांचा मनसुबा असल्याची टीका निखिल वागळे यांनी केली.

दहशतवाद्यांना वाचवणारे सर्वपक्षीय राजकारणी डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्येला तितकेच जबाबदार आहेत, असा हल्ला त्यांनी राजकारण्यांवर केला. अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी त्यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य विश्‍वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते. अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, प्रा. एल. डी. पाटील प्रमुख उपस्थित होते. ‘दाभोलकर, पानसरे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न’ असा व्याख्यानाच विषय होता. या वेळी ‘आवाज विवेकाचा’ या चित्रफितीचे अनावरण झाले.

श्री. वागळे म्हणाले, ‘‘विचारवंतांच्या हत्या करून प्रबोधनाच्या आवाजाला चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस सावध असते तर दाभोलकरांच्या नंतरच्या हत्या टळल्या असत्या. सनातन्यांना भारताला हिंदुत्ववादी पाकिस्तान करायचे आहे. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे त्यांचे स्वप्न आहे. गेली १५ वर्षे त्यांच्यावर कुणीच का कारवाई केलेली नाही? आम्ही केलेले सनातन्यांवरील आरोप आज खरे ठरत आहेत. त्यांच्या मास्टरमाइंडला अटक करा, इतकीच आमची मागणी आहे. तो आश्रमात बसलाय. पुरावे सापडत नाहीत हे कारण सांगून त्याच्यावरील कारवाई टाळली जातेय.’’

Web Title: Nikhil Wagle Talking on Sanatan Sanstha