कोल्हापूर : माजगावात गळाला लागला नऊ किलोचा मासा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

माजगाव - मुसळधार पावसामुळे कासारी नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने मासेमारी करणाऱ्यांची चंगळ झाली आहे. माजगावपैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील मासेमारी करणाऱ्या तरुणांना गळाला तब्बल नऊ किलो वजनाचा मासा सापडला आहे.

संता भोमकर, मारुती भोमकर, धनाजी भोमकर यांना मासेमारीचा छंद आहे. पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी आल्यानंतर हे तिघे गडद्या, जाळे, इंदी व गळाने याने मासे पकडतात. नेहमीप्रमाणे ते यंदाही कासारी नदीकाठी गेले होते.  

कासारी नदीला पूर आला आहे. वळण बघून त्यांनी काही गळ लावले होते. या गळाला तब्बल नऊ किलो वजनाचा पानगा जातीचा मासा त्यांना सापडला. हा मासा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine KG fish in found in Majgaon