मिरजेत नऊ लाखाचे हस्तीदंत जप्त

मिरजेत नऊ लाखाचे हस्तीदंत जप्त

सांगली -  मिरजेत हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या सुहेल अल्ताफ
मेहत्तर (वय 31, चिंचणी रस्ता, पिरजादेनगर, तासगाव) याला "एलसीबी' च्या पथकाने गुरूवारी (ता.6) रात्री अटक केली.

मिरजेतील हॉटेल नूरजवळ ही कारवाई केली. मेहत्तर याच्याकडून 8 लाख 78 हजाराचे हस्तीदंत, मोपेड आणि
मोबाईल असा 9 लाख 34 हजार 368 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी - मिरज परिसरातील वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर अधीक्षक
शशिकांत बोराटे यांनी "एलसीबी' ला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी मिरज विभागासाठी खास पथक नियुक्त केले होते. गुरूवारी रात्री हे पथक मिरज परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेव्हा नूर हॉटेलजवळील मोकळ्या जागेत मोपेडवरून आलेला एकजण हस्तीदंत विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना मिळाली.

त्यानुसार "एलसीबी' चे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर सुहेल मेहत्तर नाव असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर पॅन्टच्या खिशात
हस्तीदंताचा तुकडा मिळाला. त्यानंतर मोपेडची डिकी उघडल्यानंतर आतील नायलॉनच्या पिशवीत आणखी तीन हस्तीदंत तुकडे मिळाले. एकुण चार हस्तीदंत तुकडे मिळाले.

हस्तीदंत कोठून आणले याची चौकशी केल्यानंतर त्याने  उडवाउडवीची उत्तरे दिली. प्राथमिक तपासात तो हस्तीदंत विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली आहे. जप्त
केलेल्या हस्तीदंताची किंमत 8 लाख 78 हजार 368 रूपये आहे. हस्तीदंत तसेच मोपेड, मोबाईल असा 9 लाख 34 हजार 368 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहत्तर याच्याविरूद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

एलसीबीचे उपनिरीक्षक शिंदे, कर्मचारी निलेश कदम, बिरोबा नरळे, संदीप पाटील, चेतन महाजन, सागर टिंगरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com