नऊ परप्रांतीयांना इथे रोखले... आणि मग...

 Nine out sate labours stopped in islampur
Nine out sate labours stopped in islampur

इस्लामपूर (जि  सांगली) : 'कोरोना'मुळे घुसमटच इतकी वाढलीय की आपण काय करतोय, आजूबाजूला काय सुरू आहे? यातले काहीही कळायला मार्ग नाही. आज दुपारी अचानक इस्लामपुरात 9 परप्रांतीय दाखल झाले, पोलिसांपर्यंत बातमी गेली, पोलिसही तत्काळ दाखल झाले आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर उपस्थित पोलीस आणि नगरसेवक यांनी डोक्‍याला हात लावला. होणाऱ्या उपासमारीने बाहेर पडलेल्या 'त्या' 9 परप्रांतीय लोकांची समजूत काढून त्यांना खाउपिऊ घालून सोबत गरजेचे साहित्य देऊन परत पाठवण्याची माणुसकी इथल्या नागरिकांनी दाखवली. 

आज (ता. 9) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास 9 परप्रांतीय घोळक्‍याने इस्लामपुरात दाखल झाल्याची माहिती काहींना मिळाली. त्या प्रभागातील नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे हेदेखील त्याठिकाणी हजर झाले. पोलिसांना निरोप गेला. पोलीसही त्याठिकाणी तत्काळ दाखल झाले. हे 9 जण उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी होते. त्यांना बरेच दिवस झाले गावाकडे जायचे आहे, पण कोरोना, लॉकडाऊनमुळे त्यांना मर्यादा येत होत्या. त्यांच्यासोबत अन्य 19 लोक आहेत. हे सर्व 28 जण कवलापूर (ता. तासगाव) येथे वास्तव्यास होते. ते ज्यांच्याकडे होते,

त्यांच्याकरवी यांना उत्तरप्रदेशला पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र विलंब होत होता. गेल्या दोन दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होती. उद्या हे 28 जण उत्तरप्रदेश राज्यात त्यांच्या गावी जायला निघणार होते, असे समजले. पण इथल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे या लोकांना थांबावे लागले. गटनेते संजय कोरे यांनी असल्या उन्हात भुकेलेल्या या लोकांना आधी अन्नाची व्यवस्था केली,

दरम्यान पोलिसांनी माहिती काढून कवलापूर येथील संबंधित लोकांना संपर्क साधून बोलवून घेतले आणि त्यांना त्यांच्या ताब्यात देऊन टाकले. श्री. कोरे यांनाही ऐनवेळी 9 जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी खूप खटपट करावी लागली. त्यासाठी चव्हाण कॉर्नर मित्र मंडळाचीही मदत झाली. या 9 जणांना नेण्यासाठी पावणे पाच वाजता गाडी आली आणि त्यांना जातानाही सोबत रेशन देण्याची व्यवस्था इथल्या कार्यकर्त्यांनी करत माणुसकी दाखवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com