केडगावमधील दगडफेक प्रकरणी नऊ शिवसैनिक पोलिसांत हजर 

arrested
arrested

नगर - केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिक व संतप्त जमावाने पोलिस वाहनांची मोडतोड करून दगडफेक केली. त्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील नऊ शिवसैनिक आज कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. सात एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर आरोपी हजर झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 600 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील कलम 308 गेल्या गुरुवारी (ता. तीन) वगळण्यात आली. त्यानंतर हे आरोपी हजर झाले आहेत. 

पोलिसांनी 'त्या' सहाशे जणांविरुद्धचे 308 कलम कमी करून 324, 336, 337 ही वाढीव कलमे लावली आहेत. तसा अहवाल तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केला. त्यात 67 आरोपींची नावे निष्पन्न झाल्याचेही पोलिसांनी न्यायालयास सांगितले होते. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलिस वाहनांची मोडतोड केली. शिवाय परिसरात दगडफेकही झाली. त्यामुळे दोन दिवसानंतर सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यात माजी आमदार राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह 600 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजवरून संतोष फसले, वैभव कोतकर, विशाल पटारे, सुनील वर्मा, गोरख दळवी, अभी राऊत, सुनील सातपुते, अजित ठुबे, बंटी सातपुते, शिवा साबळे यांच्यासह अन्य दोघांची नावे समोर आली होती. यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, दंगा करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे (143, 147, 148, 149, 297, 308, 323, 332, 341, 353, 427, 504, 506) आदी कलमे लावण्यात आली होती. 

या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासामध्ये दगडफेकीत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे 308 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) कलम वगळण्यात आले आहे, तर 324, 336, 337 अशी कलमे लावण्यात आली आहेत. 

हजर झालेले आरोपी 
रावजी नांगरे, प्रफुल्ल साळुंके, गिरीश शर्मा, सुनील वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रेय नागापुरे, योगिराज गाडे, राजेश सातपुते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com