२०१७ च्या आयटीआय अनुत्तीर्णांची परीक्षा; ४ ऑक्टोबरपासून प्रारंभ

२०१७ मध्ये आयटीआयच्या विविध ट्रेडमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची सोमवार (ता. ४) ते गुरुवार (ता. ७) ऑक्टोबरअखेर पुन्हा लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Exams
Examssakal

निपाणी : २०१७ मध्ये आयटीआयच्या विविध ट्रेडमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची सोमवार (ता. ४) ते गुरुवार (ता. ७) ऑक्टोबरअखेर पुन्हा लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रत संबंधित महाविद्यालयांना पाठविली आहे. या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेची शेवटची संधी असून पुन्हा यामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास २०२२ ला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. या संधीचा फायदा उठविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.

Exams
दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये होणार कर्मवीरांच्या स्मृतींचे दालन

दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग असल्यामुळे शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद केली होती. तसेच अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. काही विद्यार्थ्यांकडे नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण झाली होती.

कोरोना, महापूर, अतिवृष्टीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही. तसेच त्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तीन वर्षे वाया गेल्यामुळे अनेकांनी पर्यायी कामांची निवड केली आहे. अनेक विद्यार्थी शेतीकडे वळले आहेत. कर्नाटक शासनाने चार वर्षांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे किती विद्यार्थी परीक्षा देणार, हे महत्त्‍वाचे ठरणार आहे.

लेखी परीक्षेची एकच संधी

२०१७ ला आयटीआयच्या सर्व ट्रेडची परीक्षा लेखी स्वरुपात झाली होती. त्यानंतर कर्नाटक शासनाने पारदर्शकता आणण्यासाठी २०१८ पासून या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या परीक्षा सध्या ऑनलाईन होत आहेत. मात्र २०१७ च्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी म्हणून ही परीक्षा लेखी होणार आहे.

"२०१७ च्या परीक्षेनंतर कोरोना, महापूर, अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे. आता या विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. त्यांच्यासाठी लेखी परीक्षेची ही शेवटची संधी असेल."- एस. आर. कुलकर्णी,प्राचार्य, मराठा मंडळ आयटीआय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com