निपाणी मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही;मंत्री जे. सी. माधूस्वामी

कोडणीत बंधारा लोकार्पण सोहळा
मंत्री जे. सी. माधूस्वामी
मंत्री जे. सी. माधूस्वामीsakal

कोडणी: निपाणी मतदार संघात विकासकामांची घोडदौड सुरू असून निपाणी मतदार संघाच्या विकासासाठी भविष्यात आपण कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. जोल्ले दांपत्यामुळे निपाणी मतदार संघ सुजलाम-सुफलाम झाल्याचे राज्याचे कायदा व पाटबंधारे मंत्री जे. सी. माधूस्वामी यांनी सांगितले. मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या वेदगंगा नदीवरील बुदिहाळ-सौंदलगा व चिकोत्रानदी वरील बुदिहाळ-चिखली या दोन्ही बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा, गंगापूजन कार्यक्रम रविवारी (ता. 10) सकाळी कोडणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते

अध्यक्षस्थानी मंत्री शशिकला जोल्ले होत्या. व्यासपीठावर कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी पाटील, निपाणीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, प्रांताधिकारी संतोष कामगौडा, ग्रामपंचायत अध्यक्षा ललिता तोरणे उपस्थित होते. प्रास्ताविकात राजू कानडे यांनी जोले दा़पत्यामुळे 50 वर्षाच्या इतिहासात या परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्याचे सांगून 2200 एकर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे सांगितले.

मंत्री माधुस्वामी म्हणाले, निपाणी मतदार संघात प्रवेश केल्यानंतर झालेला सदन भाग पाहून समाधान वाटत आहे. हे एक शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे.

मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, वेदगंगा व चिकोत्रा नदीवर बंधारा निर्मिती करण्याची अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी होती. रखडलेली मागणी पूर्ण केली असून कोडणी, बुदिहाळ, सौंदलगा व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. यापूर्वी निपाणी मतदारसंघातील डोंगर भागात पाणी समस्या गंभीर होती. मात्र बहुग्राम पाणी योजनेद्वारे हा परिसर ओलिताखाली आणण्याचा आपण प्रयत्न चालविला आहे. तलावांचे पुनरुज्जीवन, कूपनलिका खोदाई, पाणी आडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत पाण्याचे स्त्रोत निर्माण केले आहे.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी, जोल्ले दांपत्याचे कार्य संपूर्ण राज्यात आदर्शवत असल्याचे सांगितले.

कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री जोल्ले यांच्या उपस्थित गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला. परिसरातील पाणी प्रश्न सोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी जोल्ले दांम्पत्याचा नागरी सत्कार केला. यावेळी गावातील महिला कलश घेऊन उपस्थित होत्या. जलकुंभासाठी 1 गुंठे जमीन दान दिल्याबद्दल बाबुराव पाटील यांचा तर फिल्टर हाऊससाठी माजी आमदार नानासाहेब माने यांनी 5 गुंठे जमीन दान दिल्याबद्दल त्यांचे बंधू प्रा. सतीश माने यांचा सत्कार झाला. यावेळी माजी जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, निपाणी पालिका सभापती राजू गुंदेशा, हालशुगर संचालक, समित सासणे, रामगोंडा पाटील, पप्पू पाटील, पवन पाटील, बंडा घोरपडे, नितेश खोत, कल्लाप्पा नाईक, एस. एस. ढवणे, माजी ता. पं. सदस्य सदाशिव बुदिहाळे, ज्ञानदेव खवरे, अरुण खवरे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष राजू खवरे, अशोक महाजन, गणपती खोत, सुनील खवरे, विठ्ठल कोले, राजू शिंदे, रवी खोत, विठ्ठल नाईक, अनिल खोत, रावसाहेब खोत, सागर देसाई, शंकर शिरगावे जलसंपदा खात्याचे कार्यदर्शी मृत्युंजय स्वामी यांच्यासह कोडणी, बुदिहाळ, यमगर्णी, चिखली परिसरातील नागरिक उपस्थित होते. सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. सतीश माने यांनी आभार मानले. कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री जोल्ले यांनी चिकोत्रा नदीवर घाट बांधून देण्याची ग्वाही दिल्यानंतर उपस्थित महिलांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com