निपाणी : चिकनप्रेमींना महागाईच्या झळा!

२६० रुपयांवर पोहोचला भाव : खवय्यांच्या खिशाला कात्री
Chicken Price Updates | Chicken Rates
Chicken Price Updates | Chicken Ratessakal

निपाणी: इंधन दरवाढ व कोंबडीच्या खाद्यान्नात झालेल्या दरवाढीमुळे निपाणी परिसरात चिकनच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. ही विक्रमी वाढ असून प्रति किलो २३० ते २६० रुपये असे दर झाले आहेत. मटणाचे भाव वाढल्याने मांसाहारी चिकनकडे वळले होते. मात्र आता चिकनचे भावही हळूहळू वाढू लागले आहेत. त्यामुळे रविवारचा मांसाहाराचा मेनू महागला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्रीचालकांना चक्क कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. तर कित्येकांना फुकटात कोंबड्या वाटप कराव्या लागल्या. त्यानंतर महाराष्ट्रात काही महिन्यापूर्वी बर्ड फ्ल्यूची अफवा पसरल्याने पोल्ट्री चालकांनी भीतीमुळे कमी उत्पादन घेतले. आता सोयाबीन, मक्याच्या खाद्यात विक्रमी वाढ झाली आहे. चिकनच्या पिलांचे दरही वाढलेले आहे.

पूर्वी कोंबडीच्या पालनपोषणासाठी ७० ते ८० रुपये खर्च येत. आता तो १२० ते १४० रुपयांवर गेला आहे. त्याच्याच परिणाम भाववाढीवर झाला आहे.सध्या किरकोळ बाजारात २३० ते २६० रुपये किलोने ब्रॉयलरची विक्री होत आहे. दीड वर्षापूर्वी चिकनचे दर १२० ते १४० रुपये किलोपर्यंत असायचे. ते आता दुप्पट झाले आहेत. पूर्वी उत्पादन आणि मागणीमध्ये जास्त फरक नसल्याने किंमतीही स्थिर रहात. मात्र लॉकडाउनमध्ये अनेक पोल्ट्री चालकांना फटका बसल्याने त्यांना पोल्ट्री बंद कराव्या लागल्या. पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्याचे दर दुप्पट झाले, पिलांच्या किंमती वाढल्याने पोल्ट्री चालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे नाइलाजाने त्यांना कोंबडीचे दर वाढवावे लागले आहेत.

गावरानचे दर कायम

बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकन (जिवंत कोंबडा) ६५० ते ७०० रुपये किलो असे कायम आहे. हैदराबादी कोंबडीचे दर ३८० ते ४०० रुपये किलो आहे.

'कोंबडीचे खाद्य व इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ठोक बाजारात चिकनचे भाव वाढल्याने दरवाढ करावी लागली आहे. अजून भाव वाढण्याची शक्यता आहे.'

-सतीश शिरगावे, राधिका चिकन सेंटर, निपाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com