सौंदत्ती यात्रेच्या भक्तांसाठी खुशखबर; विविध गावांतून केले... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

सौंदत्ती रेणुका देवीच्या यात्रेस शुक्रवारी (ता. १० )प्रारंभ झाला असून ही यात्रा शनिवार (ता. 22 फेब्रुवारी ) अखेर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निपाणी आगारातून 700 बसेसचे नियोजन केले आहे. सोमवारपर्यंत (ता. 27) सौंदत्ती यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध गावातून 25 बसचे आरक्षण करण्यात आले आहे

निपाणी - सौंदत्ती रेणुका देवीच्या यात्रेस शुक्रवारी (ता. १० )प्रारंभ झाला असून ही यात्रा शनिवार (ता. 22 फेब्रुवारी ) अखेर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निपाणी आगारातून 700 बसेसचे नियोजन केले आहे. सोमवारपर्यंत (ता. 27) सौंदत्ती यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध गावातून 25 बसचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यादृष्टीने निपाणी आगार सज्ज असून भाविकांना यंदा सुस्थितीतील नवीन बसेस दिल्या जाणार आहेत. 

हे पण वाचा - अरे बापरे; एका हाताने तो उचलतो तब्बल 103 किलोचा दगड 

यंदा 37 रुपये प्रतिकिलो मीटर असा दर आकारला जात आहे. कर्नाटक बसची आसन क्षमता 48, 50, 52 अशी असल्यामुळे महाराष्ट्रातून सौंदत्ती यात्रेसाठी मागणी वाढली आहे. प्रतिवर्षी सौंदत्ती यात्रेत कर्नाटकासह महाराष्ट्रातील खेडेगावातून चांगली मागणी असते. त्यामुळे हुबळी परिवहन विभागाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे आगार म्हणून निपाणीचा उल्लेख केला जातो. त्यादृष्टीने भाविकांना यंदा चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यात्राकाळात भाविकांना जलद व तातडीची सेवा मिळावी, यासाठी निपाणी, यरगट्टी, रामदुर्ग, सौंदत्ती येथे तांत्रिक दुरुस्ती विभाग सुरु केले आहेत. त्यामुळे यात्रेत भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच सर्व बसेसना कॅरेजची व्यवस्था असल्यामुळे भाविकांची चांगली सोय होत आहे. गतवर्षी सौंदत्ती यात्रेतून निपाणी आगाराला 1.50 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. यंदा आगाराने 2 कोटीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने आगारातील कर्मचारी व अधिकारी प्रयत्नशील आहेत. 

हे पण वाचा - दादांचा आदेश पाळला; सांगलीच्या महापौर, उपमहापौरांचे राजीनामे 

यंदा सौंदत्ती यात्रेतील भाविकांना प्रतिवर्षापेक्षा चांगली सुविधा मिळणार आहे. सर्व बसेसना कॅरेज बसविल्याने भाविकांची सोय होणार आहे. यात्रेसाठी बस आरक्षणास प्रारंभ झाला आहे. 
-मंजुनाथ हडपद, व्यवस्थापक, निपाणी आगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nipani saundatti festival start