esakal | निपाणी वेदगंगा एफपीसी चे कार्यक्षेत्र वाढविले
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

निपाणी वेदगंगा एफपीसी चे कार्यक्षेत्र वाढविले

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : येथे शेतकऱ्यांसाठी (farmers) नव्याने स्थापन झालेल्या वेदगंगा शेतकरी उत्पादक संस्थचे (एफपीसी) (FPC) कार्यक्षेत्र वाढविले आहे. प्रारंभी ५ गावासाठी संस्था होती मात्र आता तालुक्यातील विविध १९ गावांचा समावेश संस्थेत केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सिध्दू नराटे यांनी दिली. मंगळवारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

संचालक निरंजन कमते यांनी स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष सिध्दू नराटे म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि धर्मादाय, वक्फ व हज मंत्री शशिकला जोल्ले यांच्या संकल्पनेतून तालुक्यात कृषी विभागाची एफपीसी पहिलीच संस्था स्थापन झाली आहे.

शेतकरी सभासद स्वतःच संस्थेचे व्यवस्थापन करतील. संस्थेमुळे विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतकऱयांचे गट एकत्रितीत आल्याने संघटन वाढीस लागेल. यामुळे शेतीशी संबंधित समस्येवर तोडगा काढण्याचे काम होईल. होलसेल दरात खते, बी-बियाणे खरेदी व उत्पादित मालाची विक्री किरकोळ दरात करण्याची व्यवस्था कंपनीच्या माध्यमातून होईल. शेतीचे नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठ, विविध पिके घेण्यासाठी प्रोत्साहन, उत्पादीत मालावर प्रक्रिया, उपपदार्थ उत्पादन, मालाचे वर्गीकरण करणे, भाजापाला मार्केटींग अशा विविध सेवा-सुविधा मिळतील. त्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य लाभणार आहे.

हेही वाचा: 'जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार'

इको संस्थेचे जिल्हा समन्वयक आय. एन. दोड्डगौडर म्हणाले, वेदगंगा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढल्याने सभासद संख्या दीड हजारपर्यंत असेल. दीड हजार सभासदांमध्ये १९ गावातील शेतकऱयांचा समावेश असेल. संस्थेमुळे शेतकर्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळणार असल्याने दलाली थांबणार आहे. सहाय्यक चंद्रशेखर चन्नन्नावर यांनी संस्थेचे महत्व आणि शेतकर्यांसाठी मिळणाऱया सुविधा याची माहिती सांगितली.

कृषी अधिकारी पुरुषोत्तम पिराजे, संचालक किशोर हरदारे यांनी संस्थेची माहिती दिली. बैठकीस दिलीप चव्हाण, गिरीजा सौंदलगेकर, गोपाळ नाईक, बाबासाहेब म्हाळुंगे, सिध्देश्र्वर पाटील, काकासाहेब पाटील, संदीप सदावर्ते, सुहास गुगे यांच्यासह संचालक उपस्थित होते. सचिव प्रविण घाळीमट्टे यांनी आभार मानले.

हेही वाचा: दीदींनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाल्या...

१९ गावे अशी........

आडी, भिवशी, जत्राट, अक्कोळ, निपाणी, हंचिनाळ (के-एस), ममदापूर, पडलिहाळ, सिदनाळ, सौंदलगा, पांगिर-बी, श्रीपेवाडी, जैनवाडी, बुदिहाळ, यरनाळ, लखनापूर, कोडणी, कुर्ली, नांगनूर

loading image
go to top