कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून केवळ विकासाच्या गप्पाच- निशिकांत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

कडेगाव - गेल्या दहा वर्षांपासून पालकमंत्रिपद सांभाळणाऱ्या नेत्यांच्या तालुक्‍यातील शेवटचे गाव असलेले ढाणेवाडी हे विकासापासून वंचित राहते ही बाब खेदजनक आहे. तेव्हा केवळ विकासाच्या गप्पा मारून लोकांना फसविण्याचा उद्योग कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी केल्याची टीका इस्लामपूर पालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली. 

ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत निशिकांत पाटील बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, संग्रामसिंह देशमुख, आशिष घार्गे उपस्थित होते. 

संग्रामसिंह देशमुख म्हणाले,""ढाणेवाडी गावाने सतत कॉंग्रेस पक्षाची पाठराखण केली. ज्या कॉंग्रेस नेत्यांच्यावर तुम्ही विश्‍वास ठेवला; परंतु तुमची फसवणूक झाली. तेव्हा मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. आपणास शब्द दिल्याप्रमाणे पाण्याचे काम केले आहे. येत्या सहा महिन्यांत ढाणेवाडीच्या शेतीसाठी पाणी आणून या गावामध्ये शेती बागायत करण्याचे काम करावयाचे आहे. आपण साथ द्या. विकासाठी मी तुमच्या बरोबर आहे.'' 

स्वागत शिवाजीराव वाघमोडे, आनंदराव मोरे, शिवाजीराव मदने, सुरेश यादव, विकास माने, कृष्णत पवार, शिवाजीराव ढाणे, सचिन माने, दादासाहेब यादव यांनी भाषणे केली. याप्रसंगी रामचंद्र घार्गे, शंकरराव पाटील, भगतसिंह मोहिते, हणमंतराव कदम, अशोकराव शिंदे, भरत जगताप, सुनील मोहिते उपस्थित होते.

Web Title: nishikant patil kedgaon