नितीन गडकरींच्या हस्ते संतोष वायचळ यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान  

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 31 जुलै 2018

मोहोळ(सोलापूर) - येथील तरुण उद्योजक संतोष वायचळ यांच्या बांधकाम क्षेत्रातील व्हि. एन.एस. या गृपच्या  उल्लेखनिय कार्याबद्धल महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला.   

मोहोळ(सोलापूर) - येथील तरुण उद्योजक संतोष वायचळ यांच्या बांधकाम क्षेत्रातील व्हि. एन.एस. या गृपच्या  उल्लेखनिय कार्याबद्धल महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला.   

इंडिया न्युज चॅनेल या खाजगी कंपनीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचा शोध घेत महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येतो. मोहोळ, पंढरपूर, आळेफाटा, फलटण, निरा, मेढा, पाचगणी अशा विविध ठिकाणी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्ही.एन.एस. या ग्रुपची निवड करण्यात आली होती. त्या प्रमाणे शनिवार ता .२८ जुलै रोजी पुणे येथील हॉटेल ट्रायडेंट येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते हा पुरस्कार या ग्रुपचे संचालक संतोष वायचळ यांचे कडे देण्यात आला. 

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नामदार पंकजाताई मुंडे, माजी कॅबीनेट मंत्री प्रफुल्ल पटेल, अभिनेते ॠषी कपूर,  किर्ती कुल्हारी, गायीका अनुराधा पौडवाल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या वेळी व्ही.एन.एस. संचालक सचिन भोसले, नितिन जाधव, शितल लोखंडे, उत्तम नाळे आदी  उपस्थित होते.    

ग्रामीण भागातुन एकत्र येत बांधकाम व्यवसायात उज्वल भविष्य घडवित सर्व सामान्यांना परवडतील अशी पाच लाख घरे बांधण्यांचा संकल्प व्ही.एन.एस. या ग्रुपच्या माध्यमातुन संतोष वायचळ, सचीन भोसले, नितिन जाधव, शितल लोखंडे, उत्तम नाळे यांनी केला आहे. 

Web Title: Nitin Gadkari honors Maharashtra Gaurav Puraskar to Santosh Vayalal