
नितीश पाटील बेळगावचे नवे जिल्हाधिकारी
बेळगाव : बेळगावचे नवे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी आज (ता.५) पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बंगळूरला बदली झाली. त्यांच्याजागी पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश बजाविले आहेत. राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली. यात बेळगावचे जिल्हाधिकारी हिरेमठ यांचाही समावेश आहे. हिरेमठ यांची बंगळूरला कर्नाटक पायाभूत सुविधा आणि विकास मंडळ (केआरआयडीएल) येथे बदली झाली आहे. यामुळे त्यांच्याजागी श्री पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाले आहेत. बदलीबाबत आदेश बजाविल्यानंतर श्री पाटील यांना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी पदभार हस्तांतर केला.
विधानपरिषद निवडणूक लवकरच घोषित होणार आहे. त्यानिमित्त बदली केली असल्याचे दिसते. तसेच सुमारे २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाधिकारी हिरेमठ सुमारे दीड वर्षापासून बेळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावीत आहेत. मात्र, मध्यंतरी लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या दरम्यान त्यांची बदली झाली होती. निवडणुकीनंतर परत ते रूजू झाले होते. मात्र. आता त्यांची बंगळूरला बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पाटील विजापूर जिल्हा सिंदगी तालुक्याचे. यापूर्वी त्यांनी धारवाडला जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
दरम्यान, नूतन जिल्हाधिकारी पदभार स्वीकारताना निवासी जिल्हाधिकारी अशोत दुडगुंटी, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक चन्नबसप्पा कोडली आदींसह अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Nitish Patil New Collector Belgaum Replacement Dc Hiremath Transfer 20 Ias Officers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..